Wednesday, February 9, 2011

चेहरा



सावालीसम  बदलून जाई
कधी तेजात कधी तमसेत न्हाई 
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

        नात्यांच्या कधी बंधनात
कधी माणुसकीच्या कोंदणात 
ख-या खोट्याच्या तराजूत जेव्हा 
मन तो तोलून पाही.
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

स्मित आणि हास्य पाहावे
कधी अश्रुंचे दास्य सहावे 
फुल आणि काट्यात अलगद
सुगंधात तो हरवून जाई 
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

दर्पणात  कधी  बिम्बित होऊन
 चेहरा कधी स्वतःला न्याहाळी
मुखवट्यात मी का हरवलो? 
का नशीब असे हे आपुले भाळी 
पाठ फिरवून पुन्हा नव्याने
नवा मुखवटा उचलून घेई
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

जयदीप भोगले
९/०२/२०११


No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...