ती सध्या काय करते आजकाल प्रत्येक जण विचारते
कधी वॊटसॅप च्या गर्दीत तर कधी मित्रांच्या वर्दीत प्रत्येकाला तिची नसती पंचायत असते

तिचं लग्न झालं का रे? इतक्यातच फिसकलं का रे ?
पोलीसापेक्षा यांचीच जासुसगिरी फार असते
'
'ती' चा पगार किती? 'ती'ला मुलं नाहीत कशी ?
तिच्या हातावरच्या रेषांना सुदधा यांच्यापेक्षा कमी माहिती असते
कधी 'ती' ला सुद्धा विचारा खरी कहाणी काय असते
तुमच्या कल्पनेच्या भाकितात जगण्यापेक्षा तिच्या सत्यात काय घडत असते
विस्फारलेल्या नजरेपेक्षा तिला मैत्रीची हाक हवी असते
प्रत्येकवेळी वाचवायला कृष्ण नको पण माणसांची दुनिया नक्कीच हवी असते
'ती' च्या पेक्षा तिला 'तू' बनणं जास्त पसंत असते
जयदीप भोगले
12 जानेवारी 2017
No comments:
Post a Comment