Wednesday, July 19, 2017

एकदम आईसारखं

मराठी पुरुष संसारामध्ये एका विशिष्ट परिमाणाचा वापर वेळोवेळी करतात .
 कधी ते बचावात्मक , कधी आव्हानात्मक , कधी उपहासात्मक कधी कौतुकास्पद अशा विविध प्रसंगी हे एकाच परिमाण फार चपखलपणे वापरण्याची पद्धत आहे...

 याला म्हणतात “ एकदम आईसारखं “:)

 आता मेट्रिक पद्धतीमध्ये कदाचित या वाक्याला फार गृहीत धरता येईल का नाही मला माहित नाही पण गुणवत्ता चाचणीत आणि खास करून बायको या व्यक्तीबरोबर याचा वेळोवेळी वर नमूद केल्याप्रमाणे योग्य वेळी वापर खास प्रचलित आहे

 भेंडीची भाजी चांगली किंवा वाईट अशी न होता “आज तुला एकदम आईसारखी जमलीय” अशी कौतुकाची थाप बऱ्याच बायकांनी नक्की घेतली असेल .
 तर याला मराठी घरात कौतुक असे म्हणायची पद्धत आहे

 आता हेच परिमाण जेव्हा नवरा केलीली भजी न बोलता हादडत असतो ,आणी चांगली झाली आहेत हे उघड असून सुद्धा त्यावेळी मान वाकडी करून बायको उपहास्त्मक वापर पद्धतीने करते ... “ जमलय का तुमच्या आईसारखं ? “

 आता हीच चकली किंवा अनारसा असला अनवट पदार्थ जेव्हा काही कारणास्तव फसतो त्यावेळी नवरा काही कुरकुर करत खात खात म्हणतो काहीतरी कमी आहे ग ....”आई जाम मस्त बनवते चकल्या” .. त्यावेळी बचावात्मक पद्धत ... अहो पण मोहन मी आईना विचारूनच घातल होतं

 आता आव्हानात्मक पद्धत ही नवरा नात्याने फार जपून वापरावी लागतो नाहीतर विनाकारण हा नाजूक प्रश्न दोन्ही आई व बायको या वेगवेगळ्या वेळी ऐरणीवर घेऊ शकतात व दोन्ही वेळी ऐरणीवर तुम्हीच असाल हे वेगळ सांगावे असे मला वाटत नाही

 तर कटाचे सार किंवा पुरण असले खास पदार्थ आपल्या विशेष आवडीचे आहेत असे सांगून खास कार्यक्रमाला सांगावे “ आईसारखी पुरणपोळी आणि सार कुणाला जमत नाही “ मग ते आव्हानाचे शिवधनुष्य बायको कशी पेलते हे सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने नक्कीच पहिले असेल.

 आता हीच आई “ जर तुमच्या वडिलांची असेल व तुम्ही फार पाहिली नसेल आणि देवाघरी गेली असेल “ ते सुद्धा हेच वाक्य तितक्याच मिस्कील पण तुमच्या आईला सुद्धा म्हणू शकतात – “ तुला आमच्या आईसारखी आमटी कधीच जमली नाही “ यावर ... आपलं काही अडले काय ३० वर्षात ?? अशी कमेंट उपहासत्मकपणे वापरून आव्हानात्मक पद्धतीने “ आता आहे ना सून तिला सांगा ती करेल तुमच्या आईसारखी आमटी ..”. सांगून मोकळी होते

 आता या सर्व पदार्थामध्ये कोणीही किती मीठ किती साखर गोड का तिखट असले पाककृती मोजमाप न सांगता फक्त एकदम आईसारखं अस म्हणून मोकळे होतात..

 आणि हेच सगळे आनंदाने , कमलाबाई ओगले व तरला दलाल आणि आता आम्ही सारे खवय्ये पाहत असतात आणि तिथे सुद्धा हेच वाक्य सांगून मोकळे होतात

“ असे पोहे ??? आमच्या आईला बोलवा म्हणावं... तर असच असत कि नाही सर्वांच्या आईसारखं





 टीप : ह्या सर्व सर्वसाधारण कमेंट असल्यामुळे सर्व परिमाणाचा वापर माझ्या घरी झाला आहे का असला प्रश्न विचारू नये .. व आपल्या घरी सुद्धा हे परिमाण काळजीपूर्वक वापरावे ... कारण वदनी कवळ घेता.... :) जयदीप भोगले

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...