( परदेशात राहत असलेल्या मुलास आईने सांगितलेली व्यथा ).............
उंच आकाशातल्या पक्ष्या
आता वेगाला आवर
थोड्या वेळासाठी तरी आता
स्वप्नाना सावर
तुला बोलावते घर तुला बोलावते घर
भरारी रे तुझी मोठी
पण नाही चालत रे ही काठी
कळ उठते रे पोटी
थोड्या वेळासाठी तरी आता भूवरी उतर
तुला बोलावते घर तुला बोलावते घर
दृष्टी झाली रे क्षीण
होते तुझी आठवन
स्पर्श होईल पावलांचा
बहरून जाईल आंगन
कुशितही माझ्या येइल मास मुठभर....
तुला बोलावते घर तुला बोलावते घर
नको पैसा नको अडका
बरी रे मीठ भाकर
घरचा तो राजा परदेशी ...मांडलिक, चाकर
वसंतातही आता वाटतो शिशिर
तुला बोलावते घर तुला बोलावते घर
कवी जयदीप भोगले
Subscribe to:
Post Comments (Atom)
एव्हरेस्ट
ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...
-
ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...
-
मित्रांनो , कधी कधी वैफल्य फ्रस्ट्रेशन चांगली रचना घडवून आणते याचा मला प्रत्यय आला . ही कविता मी दोन भागात जवळ जवळ ६ महिन्याच्या गॅप मध्ये...
-
वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक...
also mention the date and time of creation...
ReplyDelete