साहित्य

बिंब आणि प्रतिबिंब

My Photo
जे डी म्हणजे जयदीप, माझ्या या वाडीत कविता कथा समीक्षा परीक्षा याची आहे ही पोतडी. मी एक मार्केटिंग चा कार्यकर्ता अणि मराठीप्रेमी गडी. माझी वाडी ही मराठवाडी आवडेल तुम्हाला थोड़ी थोड़ी

Tuesday, October 19, 2010

निवड तुमची .. आवड महाराष्ट्राची - आली वेळ झी मराठी अवार्ड्सची


रसिकांच्या मनावर राज्य करणा-या आणि ११ वर्षे पाय रोवून करमणुकीत एक नवीन टप्पा गाठणार-या झी मराठी वाहिनीने नेहमीच आपल्या मनावर,आणि हो आपल्या टी वी च्या रिमोट वर, आणि आपसुखच  आपल्या हॉलवर ही   राज्य केले आहे ..
कार्यक्रमांची विविधता आणि त्याची गुणवत्ता टिकवत नेहमी काहीतरी नवीन कार्यक्रम आपल्यासमोर आणले. आपल्यासमोर रोज येऊन आपले मनोरंजन करणारे आपले कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखा या कुठेतरी वाखाणल्या जाव्यात त्यांच्या 
कार्यक्रमांना कुठेतरी पावती मिळावी म्हणून सात वर्षापुरी आपला अल्फा अवार्ड आणि आता झी मराठी अवार्ड याच्या रूपाने आपल्यासमोर आणला .आता तोच अवार्ड लवकरच मुंबईत संपन्न होणार आहे आणि कदाचित महिना अखेर बहुतेक ३० तारखेला त्याचे प्रक्षेपण होणार आहे. 
झी मराठी अवार्ड नेहमी रविवारी ७.३० वाजताच दाखवला जातो त्यामुळे प्रत्येक रविवारी टी वी समोर जाऊन बसले कि काम झाले मग कधी येणार नाही की नाही त्याचे काही मला फार विशेष महत्व वाटत नाही.
 झी मराठी अवार्ड मध्ये वेगवेगळ्या गटात कलाकारांना पुरस्कृत केले जाते उदा. व्यक्तिरेखा , उत्तम जोडी , भाऊ बहिण , कुटुंब , खलनायक , कथाबाह्य कार्यक्रम ..इत्यादि 
याचे निवेदन आणि संचलन ही एखादी जोडी करते .. एकदा अतुल परचुरे आणि सुमीत होते मागच्या वर्षी पुष्कर आणि निर्मिती 
झी मराठी अवार्ड अवार्ड बरोबर बरेच काही असते .. त्यातल्या निवेदकांच्या कॉमेंट , विनोद , मधल्या नाट्यछटा ,गाणी, नाच सर्वच भन्नाट असते  
मी हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी म्हणजे अतुल परचुरेच्या वेळी थेट पहिला होता . तो कार्यक्रम मला आजही लक्षात आहे .. त्यावेळी वाहिनीचा लाडका आदेश भाऊजी प्रेक्षकांमधून स्टेजवर आला होता आणि तेथून जो कार्यक्रम रंगला .की सांगायला शब्द नव्हते ..तेव्हा  मी पुन्हा टी वी वर तो पहिल्यापासून जाहिरातींना ना टाळता  रिमोटला न हात लावता पाहिला का ? अहो कुठे मी दिसतो का हे पाहण्यासाठी .. पण तिथे कित्तेक उत्तम चेहरे असताना माझ्या चेहऱ्यावर कॅमेरा यायला न मी प्रमुख पाहुणा आणि ना कलाकार .. पण असे नाही बर का की सामान्य प्रेक्षक दिसत नाहीत .. माझी बहिण तर दोनदा तीनदा गेली होती कार्यक्रमाना आणि सगळ्या वेळी दिसली असो ...
यावेळी मला काही व्यक्तिरेखा विशेष वाटतात .. मनु- लज्जा , बाप्पाजी - भाग्यलक्ष्मी ( ह्यांना मला बघून जाम हसू येते म्हणून मी पाहतो) 
नंतर फु बाई फु , सा रे ग म प , आणि जोडी तर माझिया प्रियाची या वेळी अवार्ड घेऊन जातील असे दिसते
शीर्षक गीत लज्जा आणि माझिया प्रिया दोन्ही मस्त आहेत पण माझिया प्रिया ला मिळेल वाटते, कारण  लोकल लोकल मध्ये मला त्याची रिंग टोन ऐकू येते ..
पण या बरोबर नाट्य छटा , गाणी , नाच पाहण्यासाठी हा टी वी वर पाहायला मजा येते आणि यावेळी सुद्धा येईल
मी तर वाट पाहणार आहे आणि तुम्ही ...

जयदीप भोगले
१९  . १० . २०१०  

No comments:

Post a Comment

Labels

;बीडच्या (1) valentine day (1) अँधेरा (1) अतुल परचुरे (1) अनंत पै (1) अनकही (1) अनुभव (1) अप्सरा (1) अफलातून (1) अमर चित्रकथा (1) अमिताभ बच्चन (1) अल्प (1) अवधूत गुप्ते (1) अश्विनी भावे (1) असंभव (1) असूया (1) आई (1) आगगाडी (1) आय बी एन लोकमत (1) आर ई सी (1) आशिक (2) आसवे (1) इ टीवि (1) इ टीवी (2) इंजिनीअर (1) इंतज़ार (1) इतिहासात (1) इन्द्रधनुष (1) इश्क (1) उ:शाप (1) उंच माझा झोका (1) उदासी (1) उमेदिची शिदोरी (1) उलझन (1) कटी पतंग (1) कट्यार (1) कथा (3) कथानक (1) करोडपति (1) कविता (57) कसक (1) क़यामत (1) कांटो (1) कातरवेळ (1) कामगार (1) कामवाली बाई (1) कारवाँ (1) कालचक्र (1) कीमत (1) कुदरत (1) केरळ (1) कोहरा (1) क्षण (1) ख़याल (1) ख़ामोशी (1) खुशियाँ (1) गणिताची (1) गुलाबी हलचल (1) गुलाम (1) ग्रेट भेट (2) चंद्र (1) चतुरंग (1) चांदनी (1) चित्र (1) चित्रकार (1) चित्रपट (5) चेहरा (1) जबरदस्त (1) जय मल्हार (1) जयदीप भोगले (2) जयदीप भोगले (89) जयदीप भोगले अश्क (1) जाऊ बाई जोरात (1) जाहिरात (1) जिंदगी (2) जिन्दगी (2) जीवनसंध्या (1) झी मराठी (9) टी वी (1) तंत्रज्ञान (1) तराजू (1) तूफ़ान (1) तेजाब (1) तो मी नव्हेच (1) दबंग (1) दरी (1) दिल (1) दीवार (1) देवदास (1) धड़कन (2) नटरंग (1) नतीजा (1) नारायण सुर्वे (1) निरोप (1) नीलपरी (1) नीलम शिर्के (1) नेहा पेंडसे (1) पत्थर (1) परदेस (1) परवाने (1) परीक्षांचे टेन्शन (1) पलटते पन्ने (1) पल्लवी (1) पांचाली (1) पालवी (1) पुरस्कार (1) पोलीस (1) प्यार (1) प्रणय (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रभात (1) प्रशांत दामले (1) प्रीती (1) प्रेम (3) प्रेमाची गोष्ट (1) प्रेमात (2) प्रेरणा (1) प्रोमो (1) प्लॅनचेट (1) फत्तेलाल (1) फिक्शन (1) फेसबुक (1) फ्रेशर (1) बंध (1) बगावत (1) बला (1) बातमी (1) बाबूजी (1) बारिश (1) बिनधास्त (1) बॉलीवूड (1) भाऊजी (1) मकरंद अनासपुरे (2) मराठी (54) महेश कोठारे (1) माझिया प्रिया (1) माधुरी पुरंदरे (1) मालिका (3) मावळे (1) माशूक (1) मास मिन्ग्लिंग (1) मास्तर (1) मित्र (1) मुग्धा वैशंपायन (1) मुस्कान (1) मूर्तिकार (1) मृगजळ (1) मेघना मलिक (1) मै (1) मोहब्बत (1) मोहोब्बत (1) मौन (1) याद (1) युद्ध (1) येळकोट (1) रजनी (1) रवि जाधव (1) रूमानी (1) रेगिस्तान (1) लक्ष्मीकांत बेर्डे (1) लब्ज (1) ललित (1) लहू (1) लाडो (2) लेख (18) लोकसत्ता (1) वड़ापाव (1) वरुणराजा (1) वादा (1) वाहिनी (2) विजय (1) वॅक्सीऩ (1) वेगळं (1) शाप (1) शायरी (11) शिकवा (1) शिवाजीराजे (1) श्रावण (1) श्रीकृष्ण (1) संघर्ष (1) संदीप खरे (1) संपादकीय (1) संवेदना (1) सदृशाच्या (1) समीक्षा (10) सलमान खान (1) सलिल (1) सागर (1) सारेगमप (2) सिनेमा (2) सी एन सी (1) सुनील पाल (1) सुहानी (1) सूर्य (1) सोनसकाळी (1) स्वप्न (2) हास्य (1) हिंदी (32) ख़ाक (1)