जब तूफ़ान में किसीका इंतज़ार होता है
तो एक पैगाम भी साहिल बन जाता है
ना सफ़र पता है ना मंजील
बस पैगाम का सहारा ही नाव का किनारा बन जाता है
एक तिनका भी किसी के प्यार का
इंतज़ार में कश्ती बन जाता है
उसीसे आती है तूफ़ान से लड़ने की उमीदे
लहरों का सामना भी उसीसे आसान हो जाता है
एक नजर के खातिर मीलो पार हो जाते है
जब उनकी आखों में प्यार का इकरार नजर आता है
एक ख़त के भरोसे कट सकती है जिंदगी
एक ख़याल मुलाक़ात का उनका दामन बन जाता है
जब कोई ख़त के लिए तड़पता है
उसके जिंदगी का लम्हा भी तूफ़ान बन जाता है
इंतज़ार होता है एक लब्ज़ का
उसका ना होना क़यामत बन जाता है
जयदीप भोगले
२००५
Wednesday, January 12, 2011
Thursday, January 6, 2011
रसिकेंद्रासाठी आणि टी वी विश्वमित्रांसाठी आलेल्या अप्सरा ...
कार्यक्रम- एका पेक्षा एक - अप्सरा आली
वेळ- बुध गुरु - ९.३० रात्रौ
पाहावा की नाही - अवश्य
नृत्य हा सर्वांनाच आवडीचा असा कलाप्रकार आणि त्या वर आधारित अनेक कार्यक्रमांचे आलेले पीक आपणाला परिचित आहेच . प्रत्येक वाहिनी हिंदी मराठी अगदी मल्याळी सुद्धा लावावी आणि आपल्याला कुठेना कुठे तरी झलक मिळेलच .. आता हे सादरीकरण किती भडक, किती तालबद्ध, आणि करणारी व्यक्ती यावर अवलंबून असते आणि आपला रिमोट याच्या दर्जावर आपले काम करत असतो म्हणजे काम आपण करतो तो तसे वागतो ..
झी मराठी वाहिनीने अतिशय उत्तम नृत्य दाखवून एका पेक्षा एक ( नावाला सार्थ ) असा कार्यक्रम गेले चार पर्व लोकांपर्यत आणला .. लोकांना कदाचित भार्गवी , आणि अमृता अजूनही आठवत असतील ..
आता आपल्याला या आठवत असतील तर आपल्या आठवणी पुसून टाकायला आणि त्यावर अजून हळुवार अशा अनुभवांची ( फक्त दर्शनीय ) अनुभूती करून द्यायला नऊ अप्सरा येत आहेत ..त्या एक आठवड्यापूर्वीच आपल्यासमोर आल्या म्हणा पण काही विश्वामित्र जर इतर वाहिन्या बघण्यात गुंग असतील तर माझी प्रतिक्रिया त्यांच्या क्रीयाशिलातेसाठी कदाचित फायद्याची होईल .
एका पेक्षा एक- अप्सरा आली असे नाव घेऊन आलेल्या या तारकांच्या नृत्यास्पर्धेला पहिल्याच भागात प्रतिसाद मिळेल अशी खात्री झाली.
फुलवा खामकर,मयूर वैद्य आणि दीपाली विचारे या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आपल्या कौशल्याचे आणि अनुभवाचे धडे या ललनांना देणार आहेत .. त्यामुळे सुंदर दिसणारी अप्सरा थिरकताना अजून किती खुलते हे काही वेगळे सांगायला नको .
आता या अप्सरा आहेत तरी कोण ? नेहा पेंडसे , गिरीजा ओंक , मृण्मयी देशपांडे , उर्मिला कानेटकर , नेहा जोशी , स्मिता तांबे , आरती सोलंकी आणि सोनाली खरे या अष्टललनासमवेत एक वादळ येत आहे ...एक सौंदर्याचा झंझावात येत आहे आणि तो म्हणजे नटरंगी नार ... सुरेखा पुणेकर ...
आता या नऊ ललना नौरासंपैकी आवडता आणि रसरशीत असा शृंगार रसाने नटलेला असा कार्यक्रम सादर करणार असतील तर लोकांच्या उड्या पडणार नाही तर नवलच ...पण आता आपण बाकी गोष्टी जरी पहिल्या तर या सर्व ब-यापैकी चांगल्या नृत्य करणा-या आहेत, उत्तम दिसण-या आहेत आणि झी मराठी मालिकांच्या एक एक रत्न आहेत ..
मध्यमवर्गीय भीती आणि अपुरे धाडस म्हणून कित्येक दिवस पुण्यात येऊन सुद्धा मी नटरंगी नार पहिला नव्हता .. पण सुरेखा पुणेकर यांना जेव्हा या शो मध्ये पहिले तर दिलखेचक म्हणजे काय ..नयनबाण म्हणजे कसा असतो याचा प्रत्यय मला आला .. आणि यावर दिपाली यांनी विचारलेला प्रश्न -- ' सुरेखाताई ( त्यांच्या) आपण जेव्हा नाचता ,तेव्हा प्रत्यक व्यक्तीला आपण त्याला इशारा करता आहात, त्याच्या डोळ्यात पाहता आहात असे का वाटते ?' कदाचित इतकी उच्च प्रश्नार्थी दाद कदाचित कुणाला मिळते किवा कोणी दिली असेल ..
सचिन ये नेहमीप्रमाणे या कार्याक्रमचे प्रमुख आणि महागुरू आहेत . त्यांनी पाहिलेली चित्रपट सृष्टी त्यांचा अभ्यास, त्यांची शायरी हे सर्वच या नृत्यांगनाना एक मोलाचे मार्गदर्शन ठरत असले पाहिजे ..
आणि माझा आवडता एकदम कोकणस्थ टोमणे देणारा ( याला कुणीही जातीयवाद म्हणू नये ) पुष्कर श्रोत्री याचे सूत्रसंचालन करतो आहे .. त्यामुळे तबला पेटी आणि घुंगरू असे त्रिकुट असते तसेच
नऊ नवतरुण आणि सुरेखा पुणेकर यांसारख्या चिरतरुण नृत्यांगना , यांचा ताल सांभाळणारे तीन दिग्दर्शक , पुष्कर श्रोती यांची चपखल सांगत ज्यावेळी झी मराठी सारख्या रंगमंचावर येत असेल तर सोने झाल्याशिवाय राहत नाही.
रसिकहो , म्हणूनच सांगतो , आपण त्याच त्याच बातम्या बघून कंटाळला असाल , एक धड मालिका नाही.. म्हणून चरफडत असाल , मुलांच्या कोडकौतुकाला विटला असाल तर काही अस्सल असे मनोरंजन घेऊन इंद्रपुरीतून नाही तर किमान मुंबपुरीतून आपल्यासाठी एका पेक्षा एक अप्सरा आल्या आहेत १०-१२ आठवडे येत राहतील .. पाहायला विसरू नका
दाद द्यायला विसरू नका
चक्षु चाणाक्ष
जयदीप भोगले
Tuesday, December 28, 2010
मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग -3
आभाळमाया - ही मालिका अल्फा मराठी वरची पहिली वाहिली मालिका , अल्फा आजचे झी मराठी जे लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले कदाचित सुरवात या मालिकेने केली . या मालिकेची गम्मत म्हणजे आजकाल आपण जे मोठे स्टार झालेले कलाकार पाहतो काहीजण वयाने सुद्धा मोठे झाले असतील ते यात अगदी नवीन होते .. उद. आपला श्रेयस तळपदे उमेश कामत वगैरे ..
ही मालिका सुकन्या कुलकर्णी यांनी एकट्याने पेलून धरली होती .. प्रत्येक व्यक्तिरेखा सुरेख होती .. आणि याचे शीर्षक गीत किती चांगले आहे हे मला वेगळे सांगायची नक्कीच गरज नाही ..
अवंतिका -- अस्मिता चित्र ची अजून एक उत्तम निर्मिती .. मातब्बर कलाकार . उत्तम अभिनय आणि तितकीच देखणी अशी मृणाल कुलकर्णी .. रांगडा संदीप कुलकर्णी .. रवींद्र मंकणी , श्रेयस तळपदे, दीपा श्रीराम अशा कितीतरी मात्तबर मंडळीनी सजलेली मालिका .. उत्तम शीर्षक गीत .. गम्मत सांगतो अवंतिका अजून एका गोष्टीमुळे मला लक्षात आहे ती या मध्ये असणा-या जाहिरातीमुळे .. कदाचित वाहिनीची लोकप्रियता आभाळमाया नंतर वाढल्याची ही पावती असावी या गोजिरवाण्या घरात - ही मालिका मी बघायचो यातील व्यक्तिरेखांसाठी आणि शामराव म्हणजे प्रदीप वेलणकर यांच्यासाठी .. इतक्या सहजपणे ते अभिनय करायचे की अशा कडक व्यक्ती मी आपल्या आजूबाजूला पहिल्या आहेत याची प्रय्तेक वेळी जाणीव व्हायची .. आणि या सिरीयल ची गम्मत म्हणजे आपल्याकडे दसरा की त्यांच्यकडे दसरा आणि आपल्याकडे शिमगा की त्यांच्याकडे .. फक्त मालिकांमध्ये शिमग्याशिवाय बोंब असते हे वेगळे ....
आजकाल प्रत्येक सणाला प्रत्येक मालिकेमध्ये तो सण साजरा केला जातो कदाचित मी हे निरीक्षण करायला या मालिकेपासून शिकलो
आता ही मालिका प्रचंड भरकटली आहे .. शामराव ही वयाने वाढले आहेत .. पण सुरवातीचे २ -३ वर्षे
नियमितपणे पहिली आणि आवडली.
ना आना इस देस लाडो ..
स्त्रीभ्रूणहत्या सारखा जड विषय उत्तर भारतातील स्त्रियांची मुस्कटदाबी आणि स्त्री स्त्रीवर अन्याय कशी करते या विषयवार आधारित मालिका ..आशय असलेल्या आणि तितक्याच तरलपणे ते हाताळून दाखवणं-या मालिका विरल्याच .. त्यातली ही एक ..
उत्तम कथानक आणि ज्वलंत विषय दैनंदिन मालिकेमधून सुरेख हाताळलेला आहे ..मेघना मलिक यांनी अम्माजी ही व्यक्तिरेखा इतकी जिवंत केली आहे की फक्त त्या व्यक्तिरेखेसाठी ही मालिका माझ्या कायमची लक्षात राहील
जस्सी जैसी कोई नाही
अग्ली बेट्टी या इंग्रजी मालिकेवर आधारित ही मालिका .. या मालिकेने मोना सिंग हिला प्रसिद्ध केले .. तिचा जस्सी चा लूक आणि जस्सी जेव्हा चष्मा काढते तेव्हाचा लूक यात मस्त शॉक होता..नंतर मोना सिंग चे टी वी करिअर जे फुलले त्यात याचा सिंहाचा वाट आहे. सोनी ला या मालिकेने बरीच लोकप्रियता दिली रोलर कोस्टर पद्धतीने वर खाली होणे सोनीची खासियत आहे त्यामुळे आज जर सोनीवर आपल्याला काही मालिका सापडली नाही तर फार नवल करण्याची गरज नाही .
असंभव
झी मराठी वर आलेले कदाचित मराठी दैनंदिन मालिकांमधील पहिले वाहिले रहस्यमय सीरिअल . दैनंदिन मालिकेमध्ये उत्कंठा आणि सस्पेन्स टिकवून ठेवणे कठीण आहे .. पण या मालिकेने ते चपखलपणे निभावले
उर्मिला कानिटकर उमेश कामत ,आनंद अभ्यंकर आणि सुहास भालेकर यांचे अभिनय आणि याबरोबर सुलेखा म्हणून अत्यंत लोकप्रिय झालेली खलनायिका नीलम शिर्के या मालिकेचे वैशिष्ट्य शीर्षक गीत सुद्धा तितकेच चांगले होते. पण या मालिकेची कथा आणि त्याची हाताळणी यामुळेच ही जास्त लोकप्रिय झाली ..
तर मित्रांनो कशा वाटल्या मालिका .. यातल्या ७०% मालिका आपल्यालाही नक्की आवडल्याच असतील याची मला खात्री आहे.
मालिका सध्या आपल्या जीवनाचे कमीतकमी स्त्री जीवनाचं अंग बनू लागले आहे . त्यातल्या सुख्दुख्मध्ये सामावून कुठेतरी अर्धातास करमणूक म्हणून मालिका आपल्या गृहस्थाश्रमाची मल्लिका बनली आहे हे काही खोटे नाही
आपल्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील ..
माल्मीकि बनू पाहणार
जयदीप भोगले
Monday, December 27, 2010
मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग -२
मित्रांनो .. रामायण, महाभारत, टिपू सुलतान, जंगल बुक, मालगुडी, टिपरे अशा असंख्य मालिका कदाचित अजून नमूद करता येतील पण ऐतिहासिक मालिका मी मुद्दाम मी समाविष्ट केल्या नाहीत .. महाभारत आणि रामायण याबद्दल आपण काही वाचावे आणि मी काही मला आवडलेली म्हणून लिहावे अशा त्या नाहीत त्या त्यापेक्षा विस्तृत आहेत. अनिमेशन हा एक वेगळा विषय होऊ शकतो . मालगुडी आणि टिपरे कदाचित काही कारणामुळे मी माझ्या यादीत मांडले नाही
मालिका निवडताना त्याची प्रसिद्धी , त्याने सुरु केलेला ट्रेंड , वाहिनीला दिलेली ओळख , कलाकाराचा पुढचा प्रवास, कथानक आणि बजेट या सर्व बाजू लक्षात घेऊन कपोलकल्पित ( फिक्शन ) कथानक मला मांडावे असे वाटले म्हणून मी या मालिका निवडल्या
बुनियाद- ही दूरदर्शनवरची अगदी सुरवातीची मालिका पण आज जी मेगा मालिकांची भाऊगर्दी जी सुरु आहे कदाचित त्याची जननी म्हणावी अशी ही मालिका. स्वातंत्र्यपूर्व काळातील पार्श्वभूमी आणि एकापेक्षा एक पैलू असलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेने दर्शकांना दिल्या .. जरी आपल्याकडे दूरदर्शनशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता , तरी आपल्याला टी वी चे तितके वेड ही नव्हते अशा काळात आपल्याला खिळवून ठेवणारी अशी मालिका म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल .मी जरा कथानक समजण्यासाठी लहान होतो पण माझ्या बहिणी या मालिकेबद्दल चर्चा करताना मला चांगले आठवते ..
स्वामी - स्मिता तळवलकर यांची कदाचित ही पहिली मालिका .. अस्मिता चित्रचा तो उडणारा पक्षी मला दिसला , नंतर वारंवार दिसला पण मला सुरवातीला वाटायचे स्वामी तर सुरु होणार नाही ना..माझ्या लहानपणी मला पेशव्यांचा इतिहास होता त्यामुळे मला या मालिकेचे विशेष आकर्षण वाटे . ऐतिहासिक विषय असून युद्ध प्रसंग नसलेली कदाचित कादंबरीवर आधारित म्हणून किवा कमी बजेट मध्ये केलेली म्हणून अशी ही मालिका होती
कित्येक दिवस मला रमाबाई आणि मृणाल कुलकर्णी ( त्याकाळच्या देव ) या एकाच असाव्यात असे भाबडेपणाने वाटायचे .. .
बंदिनी - ही मालिका चांगली का याचे शीर्षक गीत याचा फरक मला नेहमी अवघड वाटतो ..शीर्षक गीत कदाचित समर्पक आणि आशय असलेले हे पहिले वहिले गीत ...
कधी कधी मला माझ्या आईच्या डोळ्यातून का पाणी यायचे हे थोडे मोठे झाल्यावर कळले .. अत्यंत हृदयस्पर्शी कथा आणि सर्व कथा स्त्रीवर आधारित असायच्या .. मला काही कथा कळायच्या, काही त्या चांगल्या आहेत हे बंदिनी पाहणा-या लोकांच्या टिपलेल्या अश्रुवरून वरून भासयच्या.
रजनी - रविवारची टी वी पाहण्याची सुरवात म्हणजे रजनीपासून .. त्याकाळी आमच्याकडे टी वी नव्हता आम्ही अंघोळ वगैरे करून शेजारी जाऊन बसायचो ... प्रिया तेंडूलकर प्रिया तेंडूलकर आहे रजनी नाही हे कळायला मला बरीच वर्ष लागली.
तडफदार स्त्रीबद्दल मला लहानपणी ओळख करून दिली ती या रजनीने .. प्रत्येक वृत्तपत्र मासिके भाषण गल्ली बोळात रजनी बोलयाची.. आजकाल ज्या मालिकांच्या जाहिराती त्याचे भलेमोठे होर्डिंग आणि रेडीओ वर होणारी जाहिरातबाजी नसूनही नुसत्या कथानाक्च्या जोरावर हिने प्रवास केला ..
क्यो कि सास भी कभी बहु थी - मालिका या कधीकधी इतक्या शेवईसारख्या मोठ्या होतात आणि तरीसुद्धा त्या नियमितपणे पहिल्या जातात याचे हे उत्तम उदाहरण.स्टार ला स्टार करणारा करोडपती आणि सास भी कभी बहु अशी या मालिकेची ख्याती
माजघरातील स्वयंपाक घरातील राजकारण याला सुरवात याने केली. तारा हे मेगा सिरीयल होते पण क्यो कि काही औरच ..
ही मालिका कथानक चांगले म्हणून नव्हे तर एक नवा ट्रेंड आणणारी म्हणून मला आवडते .. इतक्या भरजरी साड्या, ते रडणारे पुरुष ,आमच्या शाळेपेक्षा मोठे असणारे विराणी खानदानाचे घर अशा काही विनोदी गोष्टी यात होत्या पण .. उत्तम अभिनय भव्यदिव्य सेट्स आणि काही खास व्यक्तिरेखा .. लोभस दिसणारी तुलसी नंतर तिचा वृक्षाइतका विकास झाला ते सोडा .. पण संपूर्ण भारत ही मालिका बघायची .. आणि ते सुद्धा एकदम रात्री १०.३० वाजता ..नाविन्याची सुरवात म्हणून ही मालिका मला आवडली
Friday, December 24, 2010
मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग १
मित्रांनो , आळस आणि नको तितके काम हे दोन्हीही शत्रू आपल्या छंद जोपासण्याच्या इच्छेला कसे खिंडीत पकडतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी.. गेले कित्येक दिवस काही वेळा काम म्हणून काही वेळा आळस म्हणून मी ब्लॉग पोस्ट करू शकलो नाही .. या मुळे आपल्या विश्वात फार फरक पडला असेल असे मी म्हणत नाही पण कदाचित मी काही जे माझ्या मनातले आपल्यासमोर मांडायचो ते राहून गेले . माझ्या हितचिंतक आणि मित्र या दोघानाही मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि बाकी समाजाला माझे ब्लॉग वाचावे अशी प्रार्थना करतो .. नवीन वर्षाचा नेम काय करावा असे मी विचार करत होतो तोच मला सुचले की आपण एक १० तरी पोस्ट महिन्यात टाकले तर ....आणि कदाचित मी आपल्या खासगी आयुष्यातला हाच नेम पाळणार आहे.
आरंभशूर होण्यापेक्षा नियमितपणे काहीतरी लिहिणे कदाचित काही चांगली कल्पना देऊन जाईल...
आहे का नाही ही 'आयडिया ची कल्पना' ?. आयडिया ची कल्पना हा एक सचिन दिग्दर्शित नवीन चित्रपट आजकाल टी वी वर जाहिरात करून धुमाकूळ घालतोय म्हणून हे वाक्य आठवले.
टी वी पाहणे हा माझा आवडता उद्योग त्यावरूनच मला नेहमी वाटायचे की जसे मी मला आवडणारे चित्रपट आपल्यासमोर मांडले तसे मला आवडलेल्या मालिका का सांगू नयेत ..
मालिका ही आपल्या दिवाणखान्याला लागलेली व्याधी आहे असे आपणास वाटत असेल तर हा लेख आपल्यासाठी नाही.
पण मालिका पाहता पाहता आपल्या घरी आपण स्वयंपाक (चवीवर फार चर्चा न करता) खाऊ शकतो, .. कदाचित वेळेवर जेऊ सुद्धा शकतो ( कारण ८.३० ला येणारी लज्जा सगळ्यांना पहायची असते) अशा अनेक नकळत होणा-या फायद्यांना (किमान तसे मानणाऱ्या) भगिनी, वनिता, गृहिणी आणि त्यांचाबरोबर बसून बसून मालिकेत माळून घेऊन ( रिमोट आपल्या हातात गेण्याची मुभा नसल्यामुळे )आनंद मानणा-या कुटुंबासाठी हा लेख मी लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.मालिका विषय हा जरा दैनंदिन मालिकेसारखा मोठा, भरकटत जाणारा,असा गुंतागुंतीचा आहे. कदाचित लोकांना हे टाकाऊतून टिकाऊ करण्याजोगे भासेल.
मी मालिका अगदी दूरदर्शन वर येणा-या साप्ताहिक मालिकांपासून आजकालच्या दैनंदिन मालिकापर्यंतचा आढावा घेऊन मांडणार आहे . कदाचित आपल्याला सुद्धा या आवडलेल्या असू शकतील
मी सुरवातीला फक्त मराठी मालिका घ्याव्या असा विचार केला होता पण दूरदर्शन हे भारताला फक्त २५ वर्षे जुने आहे आणि सुरवातीला आपण फक्त हिंदी पाहायचो कदाचित तेवढेच दाखवयचे म्हणून सुद्धा पण त्या मालिका जर आता असत्या तरी आपल्याला त्या आवडल्या असत्या असे मानून मी त्या सुद्धा गृहीत धरल्या ..
असो जपापेक्षा थुंकी जास्त असे न करता मी आपणासमोर त्या मांडतो.
१ बुनियाद - दूरदर्शन
२ स्वामी - मराठी दूरदर्शन
३ बंदिनी - मराठी दूरदर्शन
४ रजनी - दूरदर्शन
५ क्यो की सास भी कभी बहु थी- स्टार प्लस
५ आभाळमाया - झी मराठी
६ अवंतिका - झी मराठी
७ या गोजिरवाण्या घरात- ई टी वी
८ ना आना इस देस लाडो - कलर्स
९ जस्सी जैसी - सोनी
१० असंभव - झी मराठी
या मालिका कदाचित सर्व लोकानी पाहिलेल्या असतीलच आणि त्या कदाचित आपल्या सुद्धा आवडीच्या असू शकतील .
आता मला या का आवडल्या हे मी पुढच्या भागत सांगतो तोपर्यंत आपल्या प्रतिक्रिया आल्या तर नक्कीच आवडेल .
जयदीप भोगले
Thursday, December 2, 2010
अशी कशी ही दुनिया
गुलाबांच्या भोवती बोचतात काटे कसेडोळ्यांच्या मेघात पाणी असे दाटे कसे.
अशी कशी ही दुनिया अजब रे
भेट अशी अल्प ती विरह का मोठा असे .
हास्य ते वेड लावे मग शहाणे व्हावे कसे
आलिंगनाच्या पाशातुनी मुक्त ते व्हावे कुठे
अशी कशी ही दुनिया अजब रे
लाट टाकते बिखरून सारे, नांगर तो टाकावा कुठे
एक होण्या यत्न करावे दूर ते जावे कसे
चुंबनाचा प्याला अचानक अमृत ते घेऊन उठे
अशी कशी ही दुनिया अजब रे
प्रेमात मरण्या आलो असा मी पण मज जीवन ही शिक्षा असे
जयदीप भोगले
२-१२-२०१०
रौशनी भरा अहसास
आँखों मै रौशनी न सही पर दस्तक देती है ये किरने
सुना है लोगों से उजाला नहीं होता अंधों की दुनिया में
पर इस दुनिया का अहसास दिलाती है ये किरने
बिजली चमकती है आसमान में लोग ये कहते हैपर इस दुनिया का अहसास दिलाती है ये किरने
पर उसकी दमक से धड़क सा जाता है दिल में
मधुर झंकार सुनते है ये झरने
पर पानी भरा एक स्पर्श छु जाती है ये किरने
कवी कहते है हरी ये धरती खुला ये जहाँ
पर एक अंधे के नसीब में ये सब कहाँ
पर जब ऐसा कभी पुकारा इस दिलने
सीमेंट के जंगलो से कारखानों के धुंए से
मुडके आखों में समां जाती है ये किरने
सुना है भगवान् बड़े सुंदर दिखते है
पर हर इंसान में नहीं अब मंदिरों में बसते है
धर्म से अंधे लोगों की लड़ाई एक अंधे को दिखा जाती है ये किरने
अब सोचो नहीं समझो ये किरने है एक सच्चा मन
जो अभी तक जिन्दा है एक अंधे के मन में
दुनिया में तो लोग रास्ता भटक जाते है
पर जीवन का सही पथ बताती है ये किरने
जब चारो ओर अँधेरा है संसार में
खुश है एक अँधा सबसे इस जहाँ में
लोग देखके पछताते है यहाँ पर
सुनहरे ख्वाब दिखाती है ये किरनेजो एक अँधा समझ सकता है वाही दिखाती है ये किरने
जयदीप
४-८-१९९९
Tuesday, November 2, 2010
संघर्ष
था ख्वाब या सच्चाई थे ये
सपने जैसी हकीकत सुनाता हूँ
दिल को भी न थी खबर जिसकी
यारो , उसको को मै बयां करता हूँ
क्या थे वो दिन दोस्ती के
कुछ खट्टे थे कुछ मीठे थे
ना बात थी दिल में कुछ
हम तो सीधे साधे थे
वह थी चुलबुली ऐसी
चहकती बुलबुल जैसे थी
उसकी बाते बहते पानी जैसी
कतरे भर मैल से मैली होती थी
मै भी उसका चहेता
हर रोज था उसको कहता
अपना रिश्ता है मेरे दोस्त
हीरे और सोने जैसा
वह दिन ना भूलूंगा मै
जब मैंने उसकी आँखों में देखा
दोस्त था वो तो मेरा
एक प्यारा सा दोस्त अब बन बैठा
उस दिन रात आँखों में नींद ना आई
जब नींद ने देखा आँखों में
आँखों में थी वो समायी
पल पल मिलके दिन हुए
तो मेरा दिल कुछ और ही था
मुहब्बत जागी थी उसमे
दिल मै उसको दे चूका था
अब वह आती तो
मेरी साँसे महक जाती थी
पर मुझे कहने में था डर,
ना कर दे वो इन्कार
प्यार था दिल में मेरे पर
मंजूर ना थी मुझे यह हार
कभी लगता था ऐसे
कुछ होगा उसके मन में भी
आसमाँ जब बरसता है
भीग जाती है जमीं भी
पर ख़याल यह ख़याल ही रहा
मेरा प्यार अधुरा ही रहा
दो मनो के हालत का यह पंछी
दिल के पिंजरे में बंद ही रहा
पर अब भी मै खुश हूँ
क्योंकि पंछी मेरे पास है
पिंजरे में ही है वह चहकता
पर प्रेम गीत गुनगुनाता है
जयदीप भोगले
१२.०६.१९९९
Tuesday, October 19, 2010
निवड तुमची .. आवड महाराष्ट्राची - आली वेळ झी मराठी अवार्ड्सची
कार्यक्रमांची विविधता आणि त्याची गुणवत्ता टिकवत नेहमी काहीतरी नवीन कार्यक्रम आपल्यासमोर आणले. आपल्यासमोर रोज येऊन आपले मनोरंजन करणारे आपले कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखा या कुठेतरी वाखाणल्या जाव्यात त्यांच्या
कार्यक्रमांना कुठेतरी पावती मिळावी म्हणून सात वर्षापुरी आपला अल्फा अवार्ड आणि आता झी मराठी अवार्ड याच्या रूपाने आपल्यासमोर आणला .आता तोच अवार्ड लवकरच मुंबईत संपन्न होणार आहे आणि कदाचित महिना अखेर बहुतेक ३० तारखेला त्याचे प्रक्षेपण होणार आहे.
झी मराठी अवार्ड नेहमी रविवारी ७.३० वाजताच दाखवला जातो त्यामुळे प्रत्येक रविवारी टी वी समोर जाऊन बसले कि काम झाले मग कधी येणार नाही की नाही त्याचे काही मला फार विशेष महत्व वाटत नाही.
झी मराठी अवार्ड मध्ये वेगवेगळ्या गटात कलाकारांना पुरस्कृत केले जाते उदा. व्यक्तिरेखा , उत्तम जोडी , भाऊ बहिण , कुटुंब , खलनायक , कथाबाह्य कार्यक्रम ..इत्यादि
याचे निवेदन आणि संचलन ही एखादी जोडी करते .. एकदा अतुल परचुरे आणि सुमीत होते मागच्या वर्षी पुष्कर आणि निर्मिती
झी मराठी अवार्ड अवार्ड बरोबर बरेच काही असते .. त्यातल्या निवेदकांच्या कॉमेंट , विनोद , मधल्या नाट्यछटा ,गाणी, नाच सर्वच भन्नाट असते
मी हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी म्हणजे अतुल परचुरेच्या वेळी थेट पहिला होता . तो कार्यक्रम मला आजही लक्षात आहे .. त्यावेळी वाहिनीचा लाडका आदेश भाऊजी प्रेक्षकांमधून स्टेजवर आला होता आणि तेथून जो कार्यक्रम रंगला .की सांगायला शब्द नव्हते ..तेव्हा मी पुन्हा टी वी वर तो पहिल्यापासून जाहिरातींना ना टाळता रिमोटला न हात लावता पाहिला का ? अहो कुठे मी दिसतो का हे पाहण्यासाठी .. पण तिथे कित्तेक उत्तम चेहरे असताना माझ्या चेहऱ्यावर कॅमेरा यायला न मी प्रमुख पाहुणा आणि ना कलाकार .. पण असे नाही बर का की सामान्य प्रेक्षक दिसत नाहीत .. माझी बहिण तर दोनदा तीनदा गेली होती कार्यक्रमाना आणि सगळ्या वेळी दिसली असो ...
यावेळी मला काही व्यक्तिरेखा विशेष वाटतात .. मनु- लज्जा , बाप्पाजी - भाग्यलक्ष्मी ( ह्यांना मला बघून जाम हसू येते म्हणून मी पाहतो)
नंतर फु बाई फु , सा रे ग म प , आणि जोडी तर माझिया प्रियाची या वेळी अवार्ड घेऊन जातील असे दिसते
शीर्षक गीत लज्जा आणि माझिया प्रिया दोन्ही मस्त आहेत पण माझिया प्रिया ला मिळेल वाटते, कारण लोकल लोकल मध्ये मला त्याची रिंग टोन ऐकू येते ..
पण या बरोबर नाट्य छटा , गाणी , नाच पाहण्यासाठी हा टी वी वर पाहायला मजा येते आणि यावेळी सुद्धा येईल
मी तर वाट पाहणार आहे आणि तुम्ही ...
जयदीप भोगले
१९ . १० . २०१०
Friday, October 15, 2010
करमणुकीची सरबत्ती --- कौन बनेगा करोडपती
कार्यक्रम- कौन बनेगा करोडपती
वेळ- ९.००-१०.००
वाहिनी- सोनी
पहावा की नाही - अवश्य पहा ..
स्टार वाहिनीवर सुरवात करून स्टार आणि अमिताभ या दोघांनाही लोकप्रियतेच्या उच्चांकाला नेणारा सर्वांचा लाडका प्रश्नोतरांचा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती याने सोनी या वाहिनीवर या सोमवारपासून नवीन सुरवात नाही तर शुभारंभ केला ( कॅडबरी चोकलेट हे याचे प्रस्तुतकर्ता आहेत .)
चुरशीच्या लढाईमुळे हाच कार्यक्रम शाहरुख खान याने काही काळ सुत्रसंचालीत केला होता .. बादशाह आणि बिग बी यांची चढाओढ कितीही रंजित केली तरी यावेळी मात्र आपल्या हिंदुस्तांनाच्या नव्हे तर प्रत्येक भारतीय मनावर राज्य करणाऱ्या श्री अमिताभ बच्चन यांनी सूत्र पुन्हा आपल्या हाती घेतली ..यातच आता ही चुरशीचे पारडे कुणाकडे झुकले हे काही वेगळे नमूद करावे असे मला वाटत नाही. असो मोठ्यांच्या वादात आपलं विषयांतर नको .
सोनी वाहिनीवर जरी हा प्रोग्राम नव्याने सुरु झाला तरी यात काही लाइफ लाईन सोडल्या तर फार बदल नाहीत ..
पण अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा भेट हेच प्रमुख आकर्षण आहे.
आता लोकांनी कितीही सांगितले कि आता तो तोच तोच पणा वाटतो .. आता ती एनर्जी नाही .. अजून पुष्कळ कार्यक्रम पाहण्यासारखे आहेत. पण बच्चनची मजा काही वेगळीच
पहिल्याच भागात त्यांनी अग्निपथ आणि दिवार याचा संवाद सादर केला आणि जिंकले .. कदाचितच इतकी इंटेन्स डिलेव्हरी कुणी दुसरे करू शकते .
अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने आपल्या समोर बसलेल्या जन सामान्याला वागवतात, त्याचाशी संवाद साधतात , त्याचा आनंदाशी कुठेही वरचढ न होता एकरूप होतात हे वाखाणण्यासारखे आहे आणि हे या खेळाचे वैशिष्ट्य .. आणि कदाचित प्रश्नापेक्षा मला हेच पाहायला जास्त आवडते .
या वेळी एक्स्पर्ट पाहुणा एक नवीन भाग आहे आणि ते सुद्धा चपखलपणे बसवले आहे .
प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येक जिंकलेल्या रकमेत आपल्याला उत्तर माहिती असेल तर आपणही जिंकू शकलो असतो ही हुरहूर प्रत्येक दर्शक करत असावा ..शिवाय मी याबद्दलच्या चर्चा जुन्या करोडपति मध्ये तर रस्त्यावर, पानाच्या गादीवर, किराणा दुकानावर सुद्धा ऐकल्या आहेत ..त्यामुळे कोण स्पर्धक किती छान दिसतो पासून कोण किती बावळट ,निर्बुद्ध, ढ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आपण कितीही सुमार बुधिमत्तेचे असलो तरी आपण मस्त ठोकून देऊ शकतो कारण आपल्याला उत्तर काय.. हे माहिती होते,
अणि ही याची गम्मत आहे .
या कार्यक्रमाने स्लम डॉग ला सुद्धा मदतीचा हात दिला आणि त्या सिनेमात सुद्धा करोडपती हा महत्वाचा भाग होता.
याच कार्यक्रमाने कितीतरी क़्विज शो , विडम्ब्ने आणली .. प्रत्येक कॉमेडी कार्यक्रमात बच्चनची नक्कल केली जाऊ लागली
कदाचितच इतकी लोकप्रियता आणि त्यावर भाजून घेतलेल्या पोळ्या दुस-या कुठल्या कार्यक्रमात झाल्या असतील असे मला वाटत नाही ...
आणि सोनी वाहिनीसाठी प्रतिस्पर्धी बिग बॉस हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे सोनी ला टी आर पी साठी फायदाच होईल नव्हे एव्हाना झाला असेल
पण दूसरा हुशार मुलगा अजारी पडला म्हणून मी पहिला आलो असा कार्यक्रम करोडपति नक्कीच नाही .. आणि इतर चांगले काही नाही म्हणून बच्चन ला बघू असे दिवस किंवा दर्जा बच्चन साहेब कधीही येऊ देणार नाहीत ..
म्हणुनच सांगतो बच्चनच्या चाहत्यानी , मला लॉटरी लागली तर असे स्वप्न रंगवणा-या स्वप्नाळू दर्शकांनी ..,बरबटलेल्या कार्यक्रमातून आपल्या मुलाला कसे वाचवावे या विचारात असणा-या पालकांनी , आणि आमच्यासारख्या चूक की बरोबर ,चांगले की वाईट अशी उठाठेव करणार-या समीक्षकांनी कौन बनेगा करोडपती अवश्य पाहावा
जयदीप भोगले
१५ .१० . २०१०
नाराजी होणार नाही एवढी खात्री .. बाकी आपण सुज्ञ आहात ..
तो चलिये आप और हम देखते है दुनिया का अदभूत खेल ,, जिसका नाम है -- कौन बनेगा करोडपती ....
जयदीप भोगले
१५ .१० . २०१०
Thursday, October 14, 2010
मला भावलेले चित्रपट का पहावेत ? (भाग ५)
मित्रांनो ,
जगाच्या पाठीवर १९६०
जगाच्या पाठीवर १९६०दिग्दर्शक- राजा परांजपे
संगीत- सुधीर फडके
पटकथा आणि गीते - ग दि माडगुळकर
कलाकार- राजा परांजपे , सीमा देव, धुमाळ
ह्या चित्रपटाचे मी लहानपणी पाहिलेले पोस्टर आठवते ... जगाच्या पाठीवर लिहिलेले नाव आणि एका पेक्षा सुमधुर अशा गीतांची नावे असे या पोस्टर चे स्वरूप हिते
या वरूनच तुम्हाला कल्पना आली असेल कि या चित्रपटाची अजरामर बाजू याच्या गीतांमध्ये आहे.
मागे म्हटल्या प्रमाणे सोप्या चालींची अवीट गोडीची गाणी म्हणजे बाबूजींची गाणी .. आणि आधुनिक वाल्मिकी - गदिमांनी त्या गीतांचा प्राण म्हणजेच त्याचे शब्द असे रचले आहेत कि त्याबद्दल चांगले किंवा वाईट म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल त्यामुळे या दोघांना त्रिवार वंदन ...
गीतांबरोबर तितकीच ह्रदयस्पर्शी पटकथा दर्जेदार मन हेलावून टाकणारे कलाकारांचे अभिनय यामुळे सुद्धा हा चित्रपट मनात कायमचे घर करून जातो .
बाबूजींच्या गीतांसाठी हा चित्रपट संग्रही ..
सांगत्ये ऐका -१९५९
दिग्दर्शक- अनंत माने
कलाकार - जयश्री गडकर , सुलोचना , दादा साळवी , चंद्रकांत ,सुर्यकांत
सांगत्ये ऐका आणि जयश्री गडकर एक समीकरण आहे .. आठवणीतील चित्रपट आणि एखाद्या कलाकारासाठी लक्षात राहणारे काही चित्रपट असतात तर जयश्री गडकर यांच्यासाठी हा सिनेमा लक्षात राहतो
चित्रपटाची कथा ग्रामीण पठडीतली व प्रभावी अशी आहे .
तमाशाप्रधान चित्रपटांच्या यादीत अव्वल असणा-या यादीत या चित्रपटाचे नाव मी पहिल्या तीनात नक्की ठेवले असते
बुगडि माझी .. आणि क्लाय्मक्स चा तमाशा अतिशय सुन्दर आहेत .
श्यामची आई - १९५३
कथा - साने गुरुजी
कलाकार -वनमाला , माधव वझे , दामुनाना जोशी
श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्म्चारीत्रावरून ह्या चित्रपटाची निर्मिती झाली.
श्यामची आई हे पुस्तक प्रत्येक मराठी मनात आई आणि मुलाबद्दल च्या नात्याबद्दल आदर निर्माण करते .या चित्रपटाला पहिले भारताबाहेरील सुर्वण कमळ देऊन गौरवण्यात आले . याला राष्ट्रीय पुरस्कार हि देण्यात आला .आजच्या पैशाच्या मागे लागलेल्या जगाला गरिबीत सुद्धा आपली मूल्य ढळू कशी देऊ नये हे हा चित्रपट शिकवून जातो.
प्रत्येक मुलाने आपल्या आई बाबा बरोबर पहावा असा चित्रपट ..
दिग्दर्शक - वी शांताराम
कलाकार- केशवराव दाते , शांता आपटे, शकुंतला परांजपे
संगीत- केशवराव भोले
मला हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट म्हणून आणि कथानकाच्या पुरोगामी विचारसरणी या मुळे जास्त आवडतो.
हा चित्रपट मी अगदी अलीकडे पहिला आणि मला कथानक अजिबात माहिती नव्हते .. पण चित्रपट पाहिल्यावर त्यातला अभिनय आणि कथानकामुळे मी फार प्रभावित झालो . समाजप्रबोधन म्हणून ज्यावेळी चित्रपट बनवले जायचे त्यावेळी अशा पध्दतीची मांडणी अतिशय धाडसी वाटते ..
प्रभातच्या निर्मितीला सलाम..
संत तुकाराम - १९३६
संत तुकाराम हा चित्रपट हा त्यातल्या संत भावासाठी बघावा .. कदाचित खरे तुकाराम कसे असतील जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्यांनी हा चित्रपट पाहावा.
दिग्दर्शक- विष्णुपंत गोविंद दामले , फत्तेलाल
कलाकार - विष्णुपंत पागनीस , श्री भागवत , गौरी
संत तुकाराम हा चित्रपट हा त्यातल्या संत भावासाठी बघावा .. कदाचित खरे तुकाराम कसे असतील जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्यांनी हा चित्रपट पाहावा.माझी आजी हा चित्रपट पाहायला सिनेमागृहाच्या बाहेर चप्पल ठेऊन गेली होती .. त्यात त्या काळातल्या साध्या प्रवृत्तीचे आणि त्या चित्रपटाच्या खरेपणाचे चित्र आपल्याला समजू शकेल.
प्रभात ची अजून एक अविस्मरणीय भेट
इतके दिवस आपल्यासमोर मला आवडलेले चित्रपट टप्प्या टप्प्याने सादर केले . कदाचित आपल्याला सुद्धा हे नक्कीच आवडतील अशी आशा करतो .
या लेखाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार .
आपली मराठी चित्रपट सृष्टि अशीच समृद्ध रहो हीच सदिच्छा
जयदीप भोगले
१४.१०.१०
चित्रपट , कथानक ,प्रभात , फत्तेलाल , लेख
Monday, October 4, 2010
निरोप
तुझा गाव सोडतो आहे
तू नसशील परी मन तुझा निरोप घेऊ पाहे
आता दिसणार नाही ती साउली
फ़क्त स्वप्नात शोधणार आहे
आयुष्याच्या उंब-यावर जणू तुझी वाट पाहणार आहे
मध्यानेची रखरख ही तुझ्या केसात श्यामल झाली
आता पहाटेचा गारवा जणू दाह पोचवणार आहे
तू काचेच्या महालात मी फुलांच्या कुंपणात आहे
दोघे जणू मुक्त पण मन बंदिवान आहे
आता विचार नको प्रिये काय होते काय होणार आहे
जुनी पाने गळतात तेव्हा नवीन पालवी येणार आहे
जयदीप भोगले
१० मे २००२
Friday, October 1, 2010
मला भावलेले चित्रपट - का बघावेत ? ( भाग ४)
सिंहासन - १९८०
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर
कलाकार- अरुण सरनाईक , निळू फुले , सतीश दुभाषी ... आणि इतर सर्व मात्तबर मंडळी ...
सिंहासन हा अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या कादंबऱ्यांवर आधारित सिनेमा आहे . मल्टी स्टार चित्रपात मराठी मध्ये जरा बोटावर
मोजण्या इतकेच आहेत त्यापिकी हा एक . ७० च्या दशकात रंगमंच गाजवणारे सर्व कलाकार एकत्र येण्याची पर्वणी या चित्रपटात घडून आली .
हा चित्रपट मला कोल्ड सिनेमा या धर्तीचा वाटतो . फार तद्काहेबाज संवाद नसूनही सिनेमाची पकड सुटत नाही .
धुरंदर आणि वास्तववादी राजकारणावर प्रकाश टाकणार चित्रपट .राजकारण . समाजकारण , कामगार संघटना यांचे तिरंगी बंडाळी यात दिसते
या सर्व कलाकार मंडळींसाठी संग्रही ठेवावा असा चित्रपट
हा खेळ सावल्यांचा १९७४
कथा - मधुसूदन कालेलकर
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर
कलाकार- काशिनाथ घाणेकर, आशा काळे ,धुमाळ , राजा गोसावी
मराठी चित्रपट सृष्टीत भयपट आणि सस्पेन्स चित्रपट खूपच कमी झाले . पारध, अशी एक रात्र होती, एक रात्र मंतरलेली , झपाटलेल्या बेटावर, पण पारध सोडता बाकी सगळे सुमार होते ..
उत्तम गाणी आणि खिळवून ठेवणारी कथा या मुळे हा चित्रपट एक उत्तम भयपट म्हणून संग्रही हवा
आशा काळे मला यात विशेष आवडली .. आणि गाणी तर मला वेगळे काही सांगायला नको अशीच आहेत
सामना - १९७४
कथा आणि संवाद- विजय तेंडूलकर
कलाकार - निळू फुले , डॉ श्रीराम लागू
सामना हा चित्रपट मला या पूर्ण यादीत सर्वात जास्त आवडतो . दोन व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाची झुंज . विजय तेंडूलकर यांची कथा आणि अतिशय प्रभावी संवाद, निळूभाऊ आणि डॉ लागू यांची कदाचित सर्वोत्तम ठरावी असा अभिनय आणि संवाद शैली .
हिंदुराव पाटील आणि मास्तर ( विफल गांधीवादी ) या व्यक्तिरेखा कदाचितच कुणाला अजून उत्तम रंगवता येतील किंवा आल्या असत्या.
प्रत्येक बाबतीत हा चित्रपट सरस आहे .. हा चित्रपट रिलीज झाल्यावर ज्यांनी हा पडद्यावर पहिला मला त्यांचा हेवा वाटतो . या चित्रपटाशी निगडीत सर्व व्यक्तींना माझं त्रिवार वंदन
प्रत्येक मराठी माणसाने उत्तुंग आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट( छायाचित्रण सोडून) म्हणून हा संग्रही ठेवावाच ...
हा चित्रपट तसा अगदी नेहमीच्या पठडीतला पण . १९७० मध्ये मुंबईच्या चाळकरी जीवनतील गमती जमती आणि त्यातून फुलणारी कौटुंबिक प्रेमकथा हा विषय मस्त होता .
जयदीप भोगले
पिंजरा - १९७२
संगीत- राम कदम
गीते - जगदीश खेबुडकर
कलाकार- श्रीराम लागू, निळू फुले, संध्या
सामनाच्या दर्जाचा हा अजून एक चित्रपट . पिंजरा हा चित्रपट न ऐकलेला मराठी माणूस मी अजून पाहिलेला नाही .उत्तम लावण्या ( संगीत आणि गीते या दोन्हीही तितक्याच दर्जेदार ) आणि अभिनय याने नटलेला हा एक चित्रपट
या चित्रपट मला तर लागूंच्या व्यक्तिरेखेच्या होणा-या दैनेबद्दल डोळ्यात पाणी येते . काही काही डायरेक्शन सीन अविस्मरणीय आहेत . राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांनी या चित्रपटाचे सोने केले
सर्व दृष्टीने पंचतारांकित सिनेमा .. शांताराम बापूंच्या सिनेमा चाहत्यांच्या संग्रही असावा असा चित्रपट ..
सोंगाड्या - १९७०
संगीत - राम कदम
हा चित्रपट मी दादा कोंडके याच्या जयंतीदिवशी प्रभात सिनेमा पुणे इथे पहिला साल २००३ , आणि विशेष म्हणजे हाउसफुल ,. आणि आम्ही पहिल्या रांगेतून पहिला.
दादांच्या झंजावाती युगाची सुरवात करून देणारा चित्रपट . या नंतर दादांनी मराठी गावरान मेवा दिला ते काही सांगायची गरज नाही .
राम कदम यांचे संगीत, दादांची अफलातून अदाकारी. आणि कृश्न्धवल असून रंगीत वाटणारी गाणी यामुले हा चित्रपट अवीट गोडीचा आहे.
मुंबईचा जावई - १९७०
संगीत - सुधीर फडके
गीतकार- ग दि माडगुळकर
हा चित्रपट तसा अगदी नेहमीच्या पठडीतला पण . १९७० मध्ये मुंबईच्या चाळकरी जीवनतील गमती जमती आणि त्यातून फुलणारी कौटुंबिक प्रेमकथा हा विषय मस्त होता .याची गाणी मला कधीही ऐकायला आवडतात .. साधी आणि सोपी गाणी कशी अवीट करावीत यात बाबुजींचा हात कुणीच धरू शकणार नाही,
संगीतासाठी चित्रपट संग्रही
.. आवडते गीत आज कुणी तरी यावे आणि प्रथम तुज पाहता ..
एकटी १९६८
निर्माता - राजा ठाकूर
नावाप्रमाणेच हा चित्रपट म्हणजे आतडे पिळवटून टाकणारा सुलोचनाबाईंचा अभिनय ... खूप लहानपणी पाहिलेला चित्रपट ...
आईवेड्या मुलाने हा चित्रपट पाहून जर डोळ्यात पाणी आले नाही तर शपथ .... म्हणजे इतर लोकांनाही तितक्याच भावना आवरणार नाहीत हे ही खरे !!१
इथून दृष्ट काढते .. हे गीत ..तर लाजवाबच आहे ...मला मोलकरीण या चित्रपटापेक्षा हा चित्रपट जास्त वास्तव वाटतो म्हणून मी याला जास्त झुकते माप दिले ..
हा माझा मार्ग एकला १९६४
दिग्दर्शक - राजा परांजपे
कलाकार - सचिन ( बालकलाकार ) राजा परांजपे
हा चित्रपट एका बालकलाकाराचा म्हणालात तरी चालेल .. काही अफलातून छायाचित्रीत सीन्स , उत्तम गाणी . राजा परांजपे यांचा उच्च अभिनय
आणि हळुवार पण कष्टी करणारी कथा ...
जुन्या सालच्या सिनेमामध्य या चित्रपटाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते ..जयदीप भोगले
Subscribe to:
Posts (Atom)
एव्हरेस्ट
ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...
-
वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक...
-
ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...
-
या गोष्टीला एक १५ वर्ष झाली असतील ... मी इंजिनीरिंग च्या फर्स्ट इअर ला होतो .. आमचे कॉलेज एक मोठा कॅम्पस होता .. १२० एकर चा ..त्यावेळी रॅ...















