Wednesday, August 4, 2010

मकरंद अनासपुरे- (अ पुणेरी ) मराठी भाषेचा ट्रेंड सेटर

 - मकरंद अनासपुरे-  (अ पुणेरी ) मराठी  भाषेचा ट्रेंड सेटर


मकरंद अनासपुरे नाव नुसते उच्चारले तरी हसू फुटते आजकाल ...!!!
.. ते या वल्लीच्या नावाने नाही... तर त्या नावाने डोळ्यासमोरून  जाणाऱ्या त्याने केलेल्या चित्रपटाच्या भूमिकेने. त्यांच्या बीड नगर च्या खास भाषाशैलीने ...
मला चांगले आठवते की मी रविवारी  इ टीवी वर " दि एंड चा शेवट " कार्यक्रम पाहायचो .. ताई  सांगयची  बीडी ( बीडच्या ) भाषेमध्ये एक तरुण त्यात संयोजन करतो आणि जाम मजा येते.
बीड माझे आजोळ त्यामुळे या माणसाची शैली मला भावून गेली आणि मी अगदी सुरवाती पासून या नटाचा ' पंखा ( fan ) झालो. 
मग यशवंत, सावरखेड- एक गाव यातल्या छोट्या भूमिका हि कुठेतरी  घर करून गेल्या. वास्तव मधली छोटीशी भूमिका आणि मकरंद अनासपुरेंची अंगकाठी बघून मजा आली
मी शिक्षणानिमित्त  दिल्लीला गेलो आणि मग मला कळले कि मकरंद हि वावटळ आता वादळवाट बनू लागली आहे . माझा विश्वास बसेना .. यासाठी नाही कि या वल्लीकडे प्रतिभा नाही.. पण कौतुक ऎकायची उपेक्षित मराठवाड्याला सवय नाही .... 
. शुद्धतेच्या पुणेरीपणा रांगडा सातारी आणि कोल्हापुरीपणा ... मुंबईचा आंग्ल मराठीपणा  आणि इरसाल नागपुरी खाक्या आमच्या मराठवाडी साधेपणाला जागा देतील यावर विश्वास बसेना... 
पण मी "कायद्याच बोला" पहिला आणि सर्व लख्ख झाले. हा मराठवाडी एकलव्य अभिमन्यू बनून चित्रपट क्षेत्राचे चक्र्व्युव्ह भेदून पार गेला होता. समोर मात्तबर कलाकार असूनही मकरंद अनासपुरेनी कायद्याच बोला ची  केशव कुन्थाल्गीरीकारची भूमिका अविस्मरणीय केली. त्याची संवाद फेकेची लकब . अस्सल मराठवाडी आणि गावरान म्हणी यांनी नटलेली पण अभिनयाने तितकीच सशक्त भूमिका त्याने करण्या सुरवात केली.
हा चित्रपट सुपरहिट ठरला ... मग तद्नंतर आलेले " बघ हात दाखवून ", "नाथ पुरे आता", " गाढवाचे लग्न "असे कित्येक चित्रपट तिकीट बारीला यशस्वी ठरले .. दादू इंदुरीकरांचे अजरामर नाटक चित्रपट म्हणून  सादर  करणे खायचे  काम नव्हते पण याने ते पेलून धरले. आणि म्हणूनच छोट्या छोट्या भूमिकेत हि अनासपुरे असावा चित्रपट निर्मात्यांना वाटू लागले. 
२००५ नंतर अनासपुरे भाऊंनी मागे वळून पहिले नाही. साडे माडे तीन ,दे धक्का , जाऊ तिथे खाऊ असे कितीतरी सुपर डुपर चित्रपट त्यांनी दिले. 
दे धक्का , गोष्ट छोटी .. यात गंभीर भूमिका करण्याचा चांगला प्रयत्न केला..
मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमातही मकरंद अनासपुरेचे एखादे तरी स्कीट एका झुण्क्यासारखे टीआरपी साठी वापरणे सुरु झाले . हास्यसम्राट सारख्या शो मध्ये  सुद्धा  या हास्य सम्राटाचे नाव परीक्षक म्हणून पुढे आले.
मकरंद अनासपुरेनी "लक्ष्या "गेल्यानंतर त्यांची उणीव लोकांना हlस्यादराबारात  जाणवू दिली नाही यातच त्यांना खरी पावती आहे .
आणि मकरंद अनासपुरेनी कॉमेडी मध्ये अपुणेरी इरसाल pattern   सुरु केला आणि म्हणूनच कि काय लोकांना भाषा पद्धतीने निर्माण होणारे विनोद भावू लागले.
 म्हणूनच हास्यसम्राट चा विजेता सोलापूरचा .. कित्येक चित्रपट नागपुरी खानदेशी भाषेला प्राधान्य देऊन बनू लागले. आणि भाषे मधला हेल, शब्द , अशुद्ध्पण नसून हा भाषेचा एक प्रकार आहे हे लोकांना कळू लागले . ते आवडू लागले . 
पुणेरी भाषा हो गोड भाषा नक्कीच आहे यात वाद नाही पण त्यामुळे इतर भाषांना ही आपला बाज आहे हे कुठेतरी अनासपुरे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर लोकांना पचू लागले.
आणि कदाचित यामुळेच मी मकरंद अनासपुरे याला एक ट्रेंड सेटर मानतो आणि कदाचित 
यामुळेच तो एक सम्राट आहे कॉमेडी सम्राट......
जयदीप भोगले

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...