Tuesday, August 10, 2010

पोवाडा

डफ वाजवुनी शाहिराचा

शब्द आगीचा एका मर्दाचा
पोवाडा रचला नव्या युगाचा
स्मरून शिवराय हो जी जी जी
वंद्य त्या शिवबाने
राकट मावळ्याने
मोठ्या अभिमाने
स्वराज्य स्थापन केले जी जी जी
शिवरायांचा आठवूनी प्रताप
होते शीर नतमस्तक जी जी
पण नवीन युगाने घात केला
रांगडा गाडी तो मेला
ज्याला मिळे इनामी शेला
वाया गेला स्वार्थापायी तो र जी जी
शिवराय होते मुत्सद्दी
फिरंगी धूर्त बुद्धी
होती ठाऊक ती जी जी
आज पण ' डंकेल' फिरंगी आला
घेउनी मदिरेचा प्याला
मराठी गाडी रे त्यात वाहला हो जी जी
विसरून गेला काळी आई
सत्तेच्या पायी
पूजितो ती तुळजाई
मते मागण्या ती जी जी
आहे एका शाहिराची विनवणी
पडू द्या हो कानी
ऐका जरा अवधान देऊनी जी जी
ज्ञानोबांची संस्कृती जपा
काढू नका झोपा
ओढा बंदुकीच्या चापा
देशाभिमाने र जी जी
बना तुम्ही मराठी मावळे र जी जी

जयदीप भोगले
२१ एप्रिल १९९९


No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...