Monday, August 16, 2010

मास मिन्ग्लिंग - एका नव्या युगाची वाटचाल







आजच्या युगात ऑनलाइन क़िवा इन्टरनेट वर जाणारे लोक म्हणजे समाजपासुन  अलिप्त  किंवा एकलकोंडे असे उरले नाहीत . आता आपण एक विरोधाभासी आणि अत्याधुनिक चळवळ  अनुभवत आहोत. आज संपर्क तंत्रज्ञान लोकाना जोडून त्याना ख-या  अणि विस्तृत जगाशी संपर्कात आणण्याचा यत्न करत आहे.
संगणक ज्योतिर्भास्करानी एका दशाकापुर्वी सांगितलेले भाकित सत्यात उतरत आहे. आता लाखो लोक आपल्या जगण्याचा बहुतांशी वेळ ऑनलाइन घालवत आहेत नव्हे तर आनंदाने त्यात जगत आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की सर्व नवीन पीढ़ी घरकोंबडी  अणि समाजपरान्ग्मुख  होण्याकडे  वाटचाल करत आहेत,तर सामाजिक माध्यमे अणि मोबाइल संवाद एका सामाजिक मेळावा  या सज्ञेचे सिंचन करून  नवीन ऑनलाइन युगाची वाटचाल करत आहे.
याला व्यापारक्षेत्रात ' मास मिंग्लिंग' असे संबोधण्यात येते
या क्रान्ति मागील कारण शोधणेही तितकेच महत्वाचे वाटते. या क्रांतिचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकांची जनसंपर्कात राहण्याची आवड. मास मिंग्लिंग हे कुठल्याही प्रवृतिसारखेच लोकांच्या जनसंपर्कात राहण्याच्या आवडीमुळे   वाढते.
संगणकक्रान्ति अणि इन्टरनेट यामुळे  ही गरज  भागवणे लोकाना अधिक सोपे होऊ लागले आहे. याच कारणामुळे  लाखो लोक आपल्या आवडी निवडी, छंद, राजकीय विचारसरणी, आपल्या सौष्ठावाची माहिती मुक्तपणे प्रसिद्ध करून समविचारी हजारो मित्रमंडळे तयार करत आहेत.
काही आकडेवारी इथे नमूद करणे आवश्यक वाटते ( ही सर्व इन्टनेट जगतातील नेटवर्किंग संकेतस्थले आहेत )
ट्विट्टर -१० कोटि पेक्षा अधिक सभासद अणि ५० कोटि ट्वीट( शाब्दिक चकमक) रोज पाठवल्या जातात
फेसबुक -५० कोटि सभासद सरासरी प्रत्येकाला १३० मित्र आहेत व ती ५५ मिनिटे संकेतस्थलावर घालवतात, अणि यापैकी तीन जाने आपल्या जगातल्या पार्टीची आमंत्रने यावरून स्विकारतात.
लिंक्ड इन - साडे सहा कोटि सभासद अणि एका मिनिटाला एक नवीन सभासद सलग्न होतो.
आणि ही नवयुवा पीढ़ी  आपले अनुभव यूट्यूब , ब्लोग्स,फेसबुकच्या माध्यमाने जगाला कळवत  आहेत अणि हवे तेंव्हा हव्या त्या ठिकाणी पाहून आनंद लूटत आहेत
लोकांना खरे जग तेवढेच आवडते अणि हवे असते अणि त्यामुले ऑनलाइन तंत्राचा वापर लोक आणि व्यापारी जगत मीटिंग, सभा, पार्टी, मेळावा  या सर्वांसाठी करत आहेत. आज प्रवासी कंपन्या जगामधाला एक उत्तम व्यापार  होणे  संभाषण क्रान्तिमुळेच शक्य झाले आहे.
भारतामध्ये या युगाचा अनुभव किंवा परिणाम काही मोठ्या शहरात अणि अगदी तरुण पीढ़ीमध्ये बघायला मिळतो  पण पाश्चात्य देशात ही संस्कृति अधिकाधिक प्रगत व फैलावत चालली आहे.
कदाचित ही जगाला जवळ आणण्याची पद्धत काही पुराणमतवादी लोकाना अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला, भारतीय संस्कृतीवर प्रहार करणारी वाटू शकते पण आज असंख्य विद्यार्थी, ,नोकरिनिम्मित परदेशात राहणारे लोक यांचा दृष्टिकोण ही पडताळण्याची गरज आहे असे मला प्रकर्षाने नमूद करावे वाटते 
"ISD आणि STD च्या काळात क़िवा त्याआधी घड्याळाकडे  बघत बोलणारी, एका महिन्यनातर आलेले पत्र वाचत रडणं-या  आईची माया चांगली? की आज ऑनलाइन "chat करणारी ईमेल वर फोटो बघणारी भरारी अधिक चांगली ?याची बरोबरी करणे कठीण  आहे . शेवटी तंत्रज्ञान बद्लामुले मायेच्या ओलाव्याला कोरडेपण  कधीच येणार नाही असे मला सांगावेसे वाटते.
या अगम्य अणि अद्भुत जगाचे  आपण पुरोगामी विचारने स्वागत करायला हवे , तेव्हांच एक दिवस आपल्या भारतातल्या आईने केलेला दिवालिचा फराळ  आपली अमेरिकेतली मुलगी, बंगलौरमधला मुलगा, अणि जर्मनीमधला  भाऊ खात खात त्याच्या चाविबद्दल खुमासदार चर्चा ... ( नाही च्याट ) करत दिवाळी  साजरी करतील ...

जयदीप भोगले

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...