Tuesday, August 3, 2010

सा रे ग म (प)ल्लवी शिवाय ???




मराठी वाहिनीवरच्या विश्वात लोकप्रियतेचा एक नवीन उच्चांक गाठणारा, मराठी माणसात विशेष स्थान निर्माण केलेला, झी मराठी वरचा आयडिया सारेगमप एक नवीन पर्व पुन्हा एकदा लिटल च्माप्स "आपल्यासमोर घेऊन येतो आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नाविन्य दाखवत झी मराठीने हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी नेहमीच ताजा ठेवला आहे . हे नवीन लिल-चाम्प पर्व सर्वांच्या लाडक्या पल्लवी जोशी बरोबर असणार नाही हे या वेळेच्या सा रे ग म प च्या महा अंतिम फेरीमध्ये सांगितले गेले.

पल्लवी जोशींनी गेली आठ पर्व आपल्या सूत्रसंचालन शैलीने , टाळयांच्या विनंतीने गाण्याइतकीच मधुर केली.हे  नक्कीच रसिक कायम लक्षात ठेवतीलच .पण  कदाचित हा बदल पल्लवी च्या चाहत्यांना रुचणार नाही. मला माझ्या मित्रांच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या के त्यांना हे विचित्र वाटले ( आवडले नाही असे नाही :) ). आणि कोणताही बदल सहजगत्या न रुचणे स्वाभाविक आहे.
आत्ताच संपलेल्या पर्वाच्या शेवटच्या भागात मान्यवर परीक्षक अन्नू कपूर आले होते . भागाच्या शेवटच्या सीनमध्ये पल्लवी आणि अन्नू कपूर यांना पाहून कदाचित पल्लवी यानंतरच्या पर्वात असणार नाही असे कुठेतरी वाटून गेले. झी हिंदी वाहिनीवर अन्नू कपूर आणि पल्लवी यांनी अंताक्षरी गाजवली होती. पण नव्या काळाप्रमाणे ट्रेंड प्रमाणे त्यांना निरोप देण्यात आला. पण माझ्या मते बदल हि नाविन्याची जननी आहे. आणि झी मराठीने केलेला हा बदल कदाचित चांगलाच आहे असे कुठेतरी नवीन पर्वाच्या जाहिरातीवरून जाणवते.

अथर्व आणि मुग्धा वैशंपायन या पर्वाचे सूत्र संचालन करणार आहेत. मुग्धाने गेल्या पर्वात आपल्या आत्मविश्वासाने आणि गोड गळ्याने रसिकांच्या मनाला मुग्ध केले होते कदाचित तिचे सूत्र संचालन तिच्या बालिश शब्दांनी अजून खुलेल आणि हेच आकर्षण ठरेल.
अथर्वने एका पेक्षा एक चे छोट्या मुलांचे पर्व यशस्वीरीत्या पार पाडले त्याची जोडी म्हणचे अवखळ चिंच गुळाच्या जोडी सारखीच आंबट गोड जाणवेल.

जुन्या संगीतकारानंतर नवोदित संगीतकारांनी जशी संगीताची धुरा सांभाळली त्याचप्रमाणे नवीन बदल कदाचित नवीन काहीतरी घेऊन येईल.रामानंतर श्रीकृष्ण अवतार ही त्या काळाची गरज होती.
आणि सा रे ग म प चे यश हे केवळ सूत्र संचालनाचे नसून त्यातील संगीताच्या दर्जावर स्पर्धकांच्या गुणवत्तेवर आणि मान्यवर परीक्षकांच्या मतांवर जास्त अवलंबून आहे . त्यामुळे हा बदल बहुतेक सुखदच असेल .. त्यामुळे " आता पल्लवी नको" अशी प्रतिक्रिया येण्यापेक्षा तिने अविस्मरणीय केलेल्या सोनेरी क्षणांना सुखद आठवण बनुवून नवीन पर्वाचे स्वागतच करायला हवे.

झी मराठी ला नव्या पर्वासाठी शुभेच्छा
समीक्षा, मराठी

जयदीप भोगले

1 comment:

  1. हा बदल आवश्यकच होता. नाहीतरी आजकाल पल्लवीच्या त्याच त्याच कमेंट्सचा कंटाळा यायला लागला होता. कोण जाणे, कदाचित पुढच्या पर्वात पुन्हा ती इन होइल.

    ReplyDelete

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...