'कालचक्र' या नाटकाच्या कथे वरून प्रेरित होऊन मी हि कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सामर्थ्यशाली आणि सूर्यासम माणसाचे सुद्धा उतारवयात जी मानसिक घालमेल होते ती यात सूर्य हे प्रमुख व्यक्तिचित्र घेऊन चितारण्याचा प्रयत्न केला आहे.
ही कविता मी माझ्या कॉलेज जीवनात कालचक्र नाटक वाचून केली होती. प्रभावी कथावस्तू कशी प्रेरणा देते त्याचे हे उदाहरण वाटते
आला न परी काळोख शेवटचा
आली नकळत हि जीवनसंध्या
मध्यानेची रखरख संपे तरीही
बोचते हे जीवन सध्या
दुडूदुडू धावत पाहत संपली
बागडलो मी सोनसकाळी
धावलो मी भास्कारासंगे
पण धाप टाकिती जीवनसंध्या
चंद्राचेही डोळे दिपविले
विन्ध्यासही मी ओलांडले
पण पायथ्यास येत मी रे
मज तारका दाखविती वेडावुनी
अलगद उघडूनी मेघाचा पडदा
फाडून काळीज आकाशाचे
रविकर माझे मी वाढवियले
पण विस्तार मी वाढविता
ते विखरून गेले माझे न उरले
जीवनदात्या रवीसही ,
ग्रहण लाविती जीवनसंध्या
झाली जरीही जीवनसंध्या
सांजवात ती नेमाने करते
तरीही ' येईल अरुण सारथ्यास अपुल्या'
रात्री मज रोज सांगते
मी ही जगतो ही संध्या
मनात जपून रोज उद्या
पण अस्ताची नित्य वाट पाहते
थकलेली ही जीवनसंध्या
जयदीप भोगले
२३ जुलै १९९९
Subscribe to:
Post Comments (Atom)
31 डिसेम्बर
31 डिसेंबर मला भारी अजब वाटते कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...
-
31 डिसेंबर मला भारी अजब वाटते कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...
-
वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक...
-
मित्रांनो , कधी कधी वैफल्य फ्रस्ट्रेशन चांगली रचना घडवून आणते याचा मला प्रत्यय आला . ही कविता मी दोन भागात जवळ जवळ ६ महिन्याच्या गॅप मध्ये...
No comments:
Post a Comment