Tuesday, August 31, 2010
मैकशी
जो मै को भुलादे वो मै क्या है
जो दिल को ना जला दे वो मै क्या है
जो हलक से उतर गयी एक बार
पूछोगे ए यार तुम के तू क्या है
पैमाने से मै को पीनेवाले हजार हुए
मै से महफील सजानेवाले हजार हुए
जो मीना के आँखों से पीकर नहीं होते बेहोश
तो उसने नहीं जाना की ये मै क्या है
जब मै साथ हो तो वक्त बेवक्त नहीं होता
रात का नहीं होता इन्तजार दिन का डर नहीं होता
नशा गम से नहीं होता ज्यादा ख़ुशी से कम नहीं होता
जो नशे में फर्क जताए वो मै क्या है
जहाँ में मै कभी महफील बसाती है
तो मै मै को बेखुद कर जाती है
जो खानाबदोश होते है मैखाने से
मै से मै ना रहे वो शख्स ही क्या है
पर इस मै को भी समझाओ
की महबूब क्या होता है
मै के बूँद से है नशा तो
महबूब की हर अदा से होता है
जो माशूक को भुलादे वो मै क्या है
उस मै से क्या मतलब हमें
जो न समझे के ये इश्क क्या है
जयदीप भोगले
१३-०१-२००३
Monday, August 30, 2010
असेच... नेहमी ..आयुष्यावर बघू ( बोलू) काही .
कार्यक्रम- आयुष्यावर बोलू काही
दिनांक रविवार २९ ऑग २०१०-
वाहिनी - झी मराठीवर झाला, ( होत असतो )
बाजारात सी डी उपलब्ध आहे
सलील आणि संदीप यांची बहारदार मैफल
कालच संध्याकाळी झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी हा कार्यक्रम पुन:प्रक्षेपित करण्यात आला आणि या कार्यक्रमाबद्दल कुठेतरी लिहावे असे वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न ..
आजकाल अभिरुचीसंपन्न साहित्य, कविता ,गाणी हवी असतील तर आपल्याला जुन्या लेखकांच्या दुनियेत जावे लागते किंवा जुन्या ध्वनिमुद्रित गीतांकडे वाट वळवावी लागते असे जर आपणास वाटत असेल, तर कदाचित ही समीक्षा आपल्याला काहीसे आपले मत बदलायला लावेल पण वेगळ्या पण तितक्याच अभिरुचीच्या जगात जायची वाट दाखवेल.
डॉ सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी सुरु केलेल्या " आयुष्यावर बोलू काही " या कार्यक्रमाबद्दल जर सांगयचे झाले तर हा एक अभिरुचीसंपन्न आणि दर्जेदार मैफिल आहे जी काही काळ आपल्याला जगण्याच्या सर्व क्षणांची अलवार अशी आठवण करून देते.त्यावर प्रेम करायला शिकवते.
झी मराठीने ५०० वा विशेष भाग विशेष निर्मित करून गेल्या वर्षी आपल्या समोर सादर केला. आणि अगदी २ वेळा थेट कार्यक्रम बघणा-या लोकांनीही तितक्याच आवडीने हा कार्यक्रम पहिला .
विशेष म्हणजे सलील आणि संदीप यांच्या जोडगोळीबरोबर बेला शेंडे यांची गीते , सुनील बर्वे यांचे निवेदन यामुळे या कार्यक्रमाची लज्जत आणखीनच वाढली.
शिवाय काही मातब्बर मंडळी , सोनाली कुलकर्णी मधुरा वेलणकर यांसारखी नयन सुखवर्धक उपस्थिती कानाबरोबर डोळ्यानाही सुखावण्याची काळजी घेत होती हे ही इथे सांगावेसे वाटते .
हा कार्यक्रम एखाद्या निरस माणसाला सुद्धा कवितेबादल प्रेम नाही तर आदर तर नक्कीच निर्माण करत असावा.
तसा आयुष्यावर बोलू काही नवीन असतानाच पुण्यात मी एका छोट्या सभागृहात पाहिला होता. " मी मोर्चा नेला नाही" नामंजूर , लव लेटर , या सारख्या कवितांना मिळणारा तरुणाईचा ( माझा सुद्धा-- कारण मी सुद्धा तरुणच आहे ) प्रतिसाद पाहून कुठेतरी कळून गेले की यांची फ्यान मंडळी हि बरेच आहेत.आणि ही वाढतच जाणार आहेत
हा कार्यक्रम नुसताच तरुण लोकांचा तरुण लोकांसाठी आहे असे नाही , सलील आणि संदीप यांनी हा कार्यक्रम त्यांच्या नवीन अल्बम आणि चित्रपट गीतांनी नित्य नूतन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ढीपरी ढिपांग, अग्गोबाई ढग्गोबाई , निशाणी डावा अंगठा या मधल्या काही वेगळ्या पण श्रवणीय अशा गीतांनी अबालवृद्धाना आवडणारा बनतो आहे.

. हा कार्यक्रम म्हणजे मला माझ्या पुण्यातल्या होस्टेल जीवनासारखा पुढे जातो असे वाटते.. सकाळी उठावे बेडेकर मिसळ खावी मग, बादशाही मध्ये जेवण नंतर फुलचंद पान ,संध्याकाळी हिंदुस्तान बेकरीची प्याटीस, आणि रात्री प्रभातचा सिनेमा किंवा बालगंधर्वला नाटक अगदी पुणेरी आणि साधा वाटला तरी अस्सल मराठमोळा आणि लज्जतदार अनुभव ... अगदी तसाच अनुभव या कार्यक्रमात येतो .
आता मी इतर कार्याक्रमंवर टीका म्हणून नाही पण सांगतो प्रत्येक कार्यक्रमला आपला एक बाज असतो आणि तो तसाच पुढे जातो आणि संपतो. पण वैविध्य टिकवणे आणि सर्वाना ते आवडणे हे खूप अवघड असते
आणि " आयुष्यावर बोलू काही" मध्ये चपखलपणे हे सलील आणि संदीप साधून जातात.
आता या कार्याक्रमची सी डी बाजारात आली आहे पण तरीही मला सांगवेसे वाटते एखादी संध्याकाळ, अगदी दिवसही चालेल पण आयुष्यावर बोलू काही आपल्या शहरात आल्यास चुकवू नये .
प्रेमभंग असो की प्रेमात रंग असो , तरुण असो की म्हातारा , मित्रांची टोळी असो की मैत्रिणीची टाळी, हा कार्यक्रम कुणाबरोबर ही बघता येईल त्याचा आनंद लुटता येईल. या कार्यक्रमाबद्दल मला वेगळेसे सांगावे लागणार नाही पण इतर शहरात, भारताबाहेर आपल्याला हा कार्यक्रम माहित नसेल तर हा अवश्य पाहावा ..
म्हणूनच म्हणतो जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही .. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही...
जयदीप भोगले
३० -०८-२०१०
ख़ामोशी
ख़ामोशी एक बड़ी सजा है
पर कहते है उसका भी अपना मजा है
हसना चाहता हूँ मगर कैसे
मेरा एक घाव अभी तक ताजा है
रोने के इरादे से रो नहीं सकता कोई
आँखों के झरने है ख़ाली और ना कोई बादल गरजा है
खुशियाँ मनाऊं कैसे जब मुझपे मेरे मन का कर्जा है
घर जाना चाहता हूँ जब एक अनसुनी आवाज ने संदेसा भेजा है
पर फिसलते है कदम बढाता जब उन्हें पर कहते है के पानी बरसा है
सुना है खाव्बो के घोड़ो पे सवार सात समुंदर भी कोई जाता है
पर खाव्बो के पीछे नींद का भी साया होता है
यादो के दौर में बेबसी को भी जोश आता है
मै बगावत की सोचता हूँ पर ख़ामोशी ने मुझे रोका है
जयदीप भोगले
१८-९-९९
Friday, August 27, 2010
सदृश्यच्या मागे
संवेदना जेव्हा संपतात तेव्हा आघताची वेदना होत नसते
पण वारंवार होणा-या आघतानेच संवेदना संपत असते
महायुद्ध सुरु झाली म्हणजे रक्ताचा पाउस पडतो
पण एका रक्ताच्या थेम्बातुनाच महयुद्धाचा उदय होतो
डोंगराच्या वारुळात मुंग्यांची घरे असतात
पण वेळ अली म्हणजे त्या मेरुपर्वत ही गिळंकृत करतात
खंडकाव्य म्हणे रामयण महाभारत चित्रित करतात
पण शब्दाने काव्याचे खंड बनतात
एक अक्षरच तिला अखंड बनवतात
जयदीप भोगले
६-५-२००१
यूँ अगर होता
यूँ अगर होता के तुम पास होते
तो हम सितारों से ना बाते करते
अगर जिन्दगी में तुम्हारी आँखों के साए रहते
तो हम तपती धुप में यूँ जल ना जाते
अगर हमारे आंसू पोछने तुम्हारे हात ना आते
अश्क हमारे सागर बन जाते
इस पागल दिल को ये सवाल ना रहते
अगर जवाब हमारा तुम बन जाते
अगर गज़ल ही हमारी तुम बन जाते
शायरी के लिए ये खून के कतरे यूँ जाया ना जाते
जयदीप भोगले
३०-०९-१९९९
तो हम सितारों से ना बाते करते
अगर जिन्दगी में तुम्हारी आँखों के साए रहते
तो हम तपती धुप में यूँ जल ना जाते
अगर हमारे आंसू पोछने तुम्हारे हात ना आते
अश्क हमारे सागर बन जाते
इस पागल दिल को ये सवाल ना रहते
अगर जवाब हमारा तुम बन जाते
अगर गज़ल ही हमारी तुम बन जाते
शायरी के लिए ये खून के कतरे यूँ जाया ना जाते
जयदीप भोगले
३०-०९-१९९९
Wednesday, August 25, 2010
क़यामत
आज कुछ जख्म भर आये है
आँखों में उनकी नजरो के कुछ सपने सुहाने आये है
एक भोली सी नजर है वह
जिन के दिल के करीब हम आये है
तम्मनाओं की बहार से
एक कशिश लौट आई है
दश्त इ सहरा में एक कली सी खिल आई है
एक सवाल के आरजू से
वो जवाब बन के आई है
एक मासूम सा चेहरा है चेहरे पे लाली छाई है
इस संगदिल में धड़कन धडकते आई है
लगता है मुर्दे भी जिन्दा होते है
एक क़यामत जिंदगी बन के आई है
जयदीप भोगले
१८ नवम्बर २००३
अनकही
कभी सपने हकीकतों के साथ
कभी आँखों और आंसुओ की बात
कभी तन्हाई और वो ख़यालात
यही है अनकही एक कहानी के साथ
एक बारिश की बूँद धुप के बाद
एक फूल की नरमी कांटो के बाद
वो बेखुदी कारवां के साथ
यही है अनकही एक कहानी के साथ
एक आवाज ख़ामोशी के पास
एक लहर एक पत्थर के पास
एक जिन्दगी क़यामत के साथ
यही है अनकही एक कहानी के साथ
जयदीप भोगले
१२ नवम्बर २००४
Monday, August 23, 2010
पलटते पन्ने
इन पन्नो में लिखी कहानी कुछ नयी है कुछ पुरानी है
पलटते रहना ही बस इनके जिन्दगी की कहानी है
कुछ हसीं लम्हों का जमाना इनमे छुपता है
कभी तडपता दिल इनके सिने में सिसकता है
पहली बरसात तो पहला पन्ना था
अब गम के आंसू से ही इनको निभानी है
कभी इंद्रधनुष भी इनमे बसता था
एक चेहरे का चांद इनमे दिखता था
अब चांदनी कि चमक तो चली गयी
बस बुझते दिल कि रोशनी में जिंदगी कि कहानी लिख जानी है
दिदार ए यार का बयां इसपे लिखा है
ज़माने भर का प्यार इसमें बीता है
अब हिज्र की कलम से ही इनको तक़दीर आजमानी है
पलटते रहना ही बस इनके जिन्दगी की कहानी है
जयदीप भोगले
३० जून 2001
Sunday, August 22, 2010
चित्रकार
टूटी रेखाओ को जोड़ता हूँ
एक रंग का सपना सजाता हूँ
जब चित्रों को जिन्दा मै बनता हूँ
तभी अपने व्यक्तित्व में एक चित्रकार को मै पाता हूँ
कभी नदी नहरों को बहाता हूँ
कभी आंसू भी छलकता हूँ
सूरज की किरणों की सचेतनता महसूस मै जब करता हूँ
तभी अपने व्यक्तित्व में एक चित्रकार को मै पाता हूँ
सपने मै जीता हूँ
कई चेहरों की मुस्कान मै बनता हूँ
पर तेरे झील से नीली आँखों में जब मै खो जाता हूँ
तभी अपने व्यक्तित्व में एक चित्रकार को मै पाता हूँ
हाथ को मै बढ़ाता हूँ
रंगों को भी मै छूता हूँ
पर तेरी लाज भरी मुस्कान का रंग महसूस मै जब करता हूँ
तभी अपने व्यक्तित्व में एक चित्रकार को मै पाता हूँ
पर कुछ दिनों से मै देखता हूँ
उजाले में अँधेरे की कालिक मै पाता हूँ
जब तेरी जुदाई की सच्चाई को जब मै समझता हूँ
एक कलाकार से बेबस मै बन जाता हूँ
अपने चित्रकारी को मै भूल जाता हूँ
अपने व्यक्तित्व में एक तड़पते प्रेमी को मै पाता हूँ
जयदीप भोगले
२०-०१-२००१
Saturday, August 21, 2010
नतीजा
जिंदा होने कि परवाह नाही होती
जब प्यार हो जाता है तो
नतीजे से जिंदगी बेजार नहीं होती
अगर नाव समुंदर में हो तो
भंवर कभी राह नहीं रोकताअगर समेट भी लिया तो प्यार में तकरार नहीं होती
जब राह ही फूलों की चुनी है
तो काँटों की चुभन से कराह नहीं उठती
अगर चुभ भी गए तो लहूँ से जमीन सफ़ेद नहीं होती
अब नतीजा हां हो या ना हो
प्यार की कोई सीमा नहीं होती
अगर जीए तो प्यार में जीए
मर गए तो प्यार में शहीद हुए
आशिक की कभी हार नहीं होती
जयदीप भोगले
२४ -०६- २००३
स्वप्न
जात होतो मी सुगंधाच्या दिशेने
मुग्ध केले होते मनाचे कोने कोने
वेडे केले रे मला एका परीने धुंद गाण्याची मैफल ऐकू येत नव्हती
जेव्हा तिच्या प्रेमागानात मलाच साद होती काळोखात पाउले पुढे जात होती
जेव्हा तिची प्रेमज्योत तेवतच होती
कंटकाचा हाताना स्पर्श ही नव्हता
जेव्हा गुलाबाच्या दिशेने माझा जीव होता
सोसाट्याचा वारा धावतच होता
पण आज मात्र तो माझा नावाडी होता
भेटली ती जेव्हा माझा शोध संपला
मुखकमलाने तिच्या मुग्ध केले रे मला
प्रेमालिंगानासाठी हात पुढे ते धावले
पण हाय रे दैवा !!!! गजराच्या घंटेने स्वप्न माझे ते भंगलेजयदीप भोगले
२० -१० - ९८
Friday, August 20, 2010
विरह
डोळ्यात आसवे दाटून आली
आतूर हा जीव झाला
वाट तुझी पाहता सख्या रे
सूर्य ही मावळतीस आला
तू जीवनात येऊन अशी जादू केली
मृत्तिकेची माझी काया जणू कनकाची झाली
जगण्यास माझ्या अर्थ हा मिळाला
नदीकाठ हा आता पाहवेना
विरह अश्रुनी नदीस पूर आला
नाव तू घेउनी असे किना-यास यावे
तुझ्या नयनांच्या आरश्यात मी स्वत:ला पाहावे
आता विरह नको प्रिया चंद्र साक्षीस आला
मंद मंद ही रातराणी
सोबतीस शीतल झुळूक
आणि रात्र ही दिवाणी
अशी कातरवेळ जणू
युगुलांची जगावी
प्रहर लोटले पण तुझा निरोप न आला
कधी मज भासे विरहात सुख आहे
प्रेम माझे जीवापाड, जणू विरह मला सांगू पाहे
या एकाकी जगात, तुजवीण मज कोण आहे
माझ्या हृदयाचा जणू मला बंध हा मिळाला
जयदीप भोगले
१२-०९- २००३
आतूर हा जीव झाला
वाट तुझी पाहता सख्या रे
सूर्य ही मावळतीस आला
तू जीवनात येऊन अशी जादू केली
मृत्तिकेची माझी काया जणू कनकाची झाली
जगण्यास माझ्या अर्थ हा मिळाला
नदीकाठ हा आता पाहवेना
विरह अश्रुनी नदीस पूर आला
नाव तू घेउनी असे किना-यास यावे
तुझ्या नयनांच्या आरश्यात मी स्वत:ला पाहावे
आता विरह नको प्रिया चंद्र साक्षीस आला
मंद मंद ही रातराणी
सोबतीस शीतल झुळूक
आणि रात्र ही दिवाणी
अशी कातरवेळ जणू
युगुलांची जगावी
प्रहर लोटले पण तुझा निरोप न आला
कधी मज भासे विरहात सुख आहे
प्रेम माझे जीवापाड, जणू विरह मला सांगू पाहे
या एकाकी जगात, तुजवीण मज कोण आहे
माझ्या हृदयाचा जणू मला बंध हा मिळाला
जयदीप भोगले
१२-०९- २००३
Thursday, August 19, 2010
हवी हवीशी वाटणारी ... (ग्रेट) भेट
कार्यक्रम - ग्रेट भेट
वाहिनी - आय बी एन लोकमत
वेळ - शनिवार ९ .३० रात्रौ, रविवार दुपारी १२

आय बी एन वाहिनीवर प्रक्षेपित होणारा ग्रेट भेट या कार्यक्रम तसा सुरु होऊन बरेच दिवस झाले पण गेले काही रविवार मी नियमित बघत असतो.नियमीतपणा हा सवयीमुळे किवा आवडीमुळे निर्माण होतो असे म्हणतात
यात आपल्याला ज्यांच्याबद्दल जाणून घ्यावे वाटते , ज्यांनी आपल्या क्षेत्रात विशेष उंची गाठली आहे अशा काही दिग्गज सेलेब्रिटीबरोबर निखील वागळे दिलखुलास बातचीत करतात. मी ते त्यांची मुलाखत घेतात असे म्हणणार नाही कारण मुलाखती इतकी औपचारिकता न आणता पण समोरच्या व्यक्तीच्या आदराच्या स्थानाला धक्का न पोहचवता ते एक एक पान उलटत जातात असे वाटते. भेट मग राजकारणासारख्या रुक्ष भासण-या क्षेत्रातील दिग्गजांची असो की नाट्यक्षेत्रात , चित्रपट क्षेत्रासारख्या चंदेरी दुनियेतील असो ती तितक्याच सहजतेने आणि कलात्मक पद्धतीने पुढे जाते ही या कार्याक्रमची खासियत वाटते.
गप्पा होताना निखील वागळे कुठेही त्या व्यक्तिमत्वाच्या आड येतात असे वाटत नाही . हिंदी वाहिनींवर बर-याच वेळा मला असे प्रकर्षाने जाणवते की मुलाखातकाराची उंची आणि स्तर वाढवा आणि त्याच्या कौशल्याचे कुठे तरी मूल्यमापन व्हावे म्हणूनच की काय उत्तुंग व्यक्तींना बोलावण्यात येते आणि ह्यांची सिधी बात कधी वाकड्या वळणावर जाते ते कळतच नाही बहुदा ती सरळ रस्ता गाठतच नाही.कार्यक्रम अगदीच व्यावसाईक नसल्यामुळे घाईत लोकल पकडल्यासारखे ब्रेक घेण्याची इथे पद्धत नाही. आणि निखील वागळे आजचा सवाल यात घणाघाती शब्द घाव घालत असले तरी इथे कुठेतरी परिपक्व होऊन आपण कदाचित भेटीला येणा-या व्यक्तीचे स्वगत ऐकत आहोत इतक्या मुक्तपणे कार्यक्रम पुढे नेतात.
कार्यक्रमातील व्यक्तींची निवड अगदी त्या चपखलपणे केलेली असते. मी निवडणुका असतना मा. शरद पवार, मा. राजसाहेब ठाकरे. आणि इतर सर्व पक्षांच्या प्रमुख व्यक्तींची भेट बघितली आणि ती माणसे वेगळ्या पक्षाची आहेत एवढीच वेगळी वाटली त्यांची कामाची जिद्द , त्यांचा दृष्टीकोन हा सर्व कुठेतरी दिसून आला. त्यांची उंची आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ आहे असे कुठेतरी वाटुन गेले . खरेतर निवडणुकींच्या काळात अशा पद्धतीने मुलाखत घेणे मला अवघड वाटते. (मी मुलाखत घेणारा नसलो तरीही )
जयदीप भोगले
डॉक्टर लागूंची मुलाखत , शोभा दे यांची मुलाखत या मला विशेष आवडल्या कदाचित मला त्या क्षेत्राबद्दल आवड आहे किवा कुतूहल आहे म्हणून सुद्धा असेल .पण बाकी ग्रेट भेटी सुद्धा मला तितक्याच भावून गेल्या., कुठेतरी हव्या हव्याशा वाटून गेल्या .
मूल्यमापनच करायचे झाले तर ई टी वी वरचा संवाद हा एकाच कार्यक्रम कदाचित याच्या स्पर्धेत टिकू शकेल किंवा कदाचित थोडा वरचढ ठरेल असे मला सांगावे वाटते .पण त्यामुळे याची गुणवत्ता कुठेही कमी पडत नाही
येत्या रविवारी नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेले दिवंगत आ. नारायण सुर्वे यांची पुर्वासंग्रहित ग्रेट भेट असणार आहे हे मला वाहिनीच्या संकेतस्थळावर कळाले. आपण माझ्या मतांशी सहमत असाल किंवा या लेखामुळे आपले भेटीबद्दल कुतूहल वाढले असेल, तर चला तर मग ... वाफाळलेल्या चहाच्या कपाबरोबर एका नवीन भेटीला ... जयदीप भोगले
Wednesday, August 18, 2010
आशिक की दास्ताँ
तुम इस मोड़ पे मुझसे मिले की जहाँ आगे रास्ता नहीं था
हाथ बढाया था तुने मगर तब मेरा साथ ही नहीं था
तड़पता रहा मई पानी के बिना मगर वहां कोई नहीं था
तुमने सागर बहाया मगर मेरी साँसों में तब दम ही नहीं था
लौट रही थी मन की मौजे मन के समुंदर में जब साहिल ही नहीं था
अब साहिल इन्तजार करता है रात दिन जब दरया में पानी ही नहीं था
मेरी ख़राशे घाव बन गए तब दवा लगाने कोई नहीं था
तुम मरहम लेके आ गए जब घाव क्या मै ही नहीं था
अब न बहाओ आसुंओ को मै आज नहीं कल था
पर सुनना लोगों से कभी किस्सों में ... तुम्हारा भी आशिक हुआ करता था
जयदीप भोगले
१८ -१०-१९९९
हाथ बढाया था तुने मगर तब मेरा साथ ही नहीं था
तड़पता रहा मई पानी के बिना मगर वहां कोई नहीं था
तुमने सागर बहाया मगर मेरी साँसों में तब दम ही नहीं था
लौट रही थी मन की मौजे मन के समुंदर में जब साहिल ही नहीं था
अब साहिल इन्तजार करता है रात दिन जब दरया में पानी ही नहीं था
मेरी ख़राशे घाव बन गए तब दवा लगाने कोई नहीं था
तुम मरहम लेके आ गए जब घाव क्या मै ही नहीं था
अब न बहाओ आसुंओ को मै आज नहीं कल था
पर सुनना लोगों से कभी किस्सों में ... तुम्हारा भी आशिक हुआ करता था
जयदीप भोगले
१८ -१०-१९९९
Tuesday, August 17, 2010
सवाल मत पुछो
धडकनों को ना पुछो की तुम क्यों धडकती हो
चिरागों को न पुछो तुम क्यों सुलगते हो
फूल को ना पुछो तुम क्यों महकते हो
सवाल ना करो मेरे यारो
क्यों आशिकों को परखते हो
पायल क्यों छनकती है
बुलबुल क्यों चहकती है
हवा का झोंका ना हो तो भी
चिलमन क्यों लहराती है
महसूस करो इनको मेरे यारो
क्यों लब्ज पे अटकते हो
हीना कब रंग लती है
कली कब फूल बन जाती है
शायरी कब बन जाती है
जवाब ना मांगो मेरे यारो
मोहब्बत सब सिखाती है
जयदीप भोगले
१० एप्रिल १९९९
Monday, August 16, 2010
मास मिन्ग्लिंग - एका नव्या युगाची वाटचाल
आजच्या युगात ऑनलाइन क़िवा इन्टरनेट वर जाणारे लोक म्हणजे समाजपासुन अलिप्त किंवा एकलकोंडे असे उरले नाहीत . आता आपण एक विरोधाभासी आणि अत्याधुनिक चळवळ अनुभवत आहोत. आज संपर्क तंत्रज्ञान लोकाना जोडून त्याना ख-या अणि विस्तृत जगाशी संपर्कात आणण्याचा यत्न करत आहे.
संगणक ज्योतिर्भास्करानी एका दशाकापुर्वी सांगितलेले भाकित सत्यात उतरत आहे. आता लाखो लोक आपल्या जगण्याचा बहुतांशी वेळ ऑनलाइन घालवत आहेत नव्हे तर आनंदाने त्यात जगत आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की सर्व नवीन पीढ़ी घरकोंबडी अणि समाजपरान्ग्मुख होण्याकडे वाटचाल करत आहेत,तर सामाजिक माध्यमे अणि मोबाइल संवाद एका सामाजिक मेळावा या सज्ञेचे सिंचन करून नवीन ऑनलाइन युगाची वाटचाल करत आहे.
याला व्यापारक्षेत्रात ' मास मिंग्लिंग' असे संबोधण्यात येते
या क्रान्ति मागील कारण शोधणेही तितकेच महत्वाचे वाटते. या क्रांतिचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकांची जनसंपर्कात राहण्याची आवड. मास मिंग्लिंग हे कुठल्याही प्रवृतिसारखेच लोकांच्या जनसंपर्कात राहण्याच्या आवडीमुळे वाढते.
संगणकक्रान्ति अणि इन्टरनेट यामुळे ही गरज भागवणे लोकाना अधिक सोपे होऊ लागले आहे. याच कारणामुळे लाखो लोक आपल्या आवडी निवडी, छंद, राजकीय विचारसरणी, आपल्या सौष्ठावाची माहिती मुक्तपणे प्रसिद्ध करून समविचारी हजारो मित्रमंडळे तयार करत आहेत.
काही आकडेवारी इथे नमूद करणे आवश्यक वाटते ( ही सर्व इन्टनेट जगतातील नेटवर्किंग संकेतस्थले आहेत )
ट्विट्टर -१० कोटि पेक्षा अधिक सभासद अणि ५० कोटि ट्वीट( शाब्दिक चकमक) रोज पाठवल्या जातात
फेसबुक -५० कोटि सभासद सरासरी प्रत्येकाला १३० मित्र आहेत व ती ५५ मिनिटे संकेतस्थलावर घालवतात, अणि यापैकी तीन जाने आपल्या जगातल्या पार्टीची आमंत्रने यावरून स्विकारतात.
लिंक्ड इन - साडे सहा कोटि सभासद अणि एका मिनिटाला एक नवीन सभासद सलग्न होतो.
आणि ही नवयुवा पीढ़ी आपले अनुभव यूट्यूब , ब्लोग्स,फेसबुकच्या माध्यमाने जगाला कळवत आहेत अणि हवे तेंव्हा हव्या त्या ठिकाणी पाहून आनंद लूटत आहेत
लोकांना खरे जग तेवढेच आवडते अणि हवे असते अणि त्यामुले ऑनलाइन तंत्राचा वापर लोक आणि व्यापारी जगत मीटिंग, सभा, पार्टी, मेळावा या सर्वांसाठी करत आहेत. आज प्रवासी कंपन्या जगामधाला एक उत्तम व्यापार होणे संभाषण क्रान्तिमुळेच शक्य झाले आहे.
भारतामध्ये या युगाचा अनुभव किंवा परिणाम काही मोठ्या शहरात अणि अगदी तरुण पीढ़ीमध्ये बघायला मिळतो पण पाश्चात्य देशात ही संस्कृति अधिकाधिक प्रगत व फैलावत चालली आहे.
कदाचित ही जगाला जवळ आणण्याची पद्धत काही पुराणमतवादी लोकाना अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला, भारतीय संस्कृतीवर प्रहार करणारी वाटू शकते पण आज असंख्य विद्यार्थी, ,नोकरिनिम्मित परदेशात राहणारे लोक यांचा दृष्टिकोण ही पडताळण्याची गरज आहे असे मला प्रकर्षाने नमूद करावे वाटते
"ISD आणि STD च्या काळात क़िवा त्याआधी घड्याळाकडे बघत बोलणारी, एका महिन्यनातर आलेले पत्र वाचत रडणं-या आईची माया चांगली? की आज ऑनलाइन "chat करणारी ईमेल वर फोटो बघणारी भरारी अधिक चांगली ?याची बरोबरी करणे कठीण आहे . शेवटी तंत्रज्ञान बद्लामुले मायेच्या ओलाव्याला कोरडेपण कधीच येणार नाही असे मला सांगावेसे वाटते.
या अगम्य अणि अद्भुत जगाचे आपण पुरोगामी विचारने स्वागत करायला हवे , तेव्हांच एक दिवस आपल्या भारतातल्या आईने केलेला दिवालिचा फराळ आपली अमेरिकेतली मुलगी, बंगलौरमधला मुलगा, अणि जर्मनीमधला भाऊ खात खात त्याच्या चाविबद्दल खुमासदार चर्चा ... ( नाही च्याट ) करत दिवाळी साजरी करतील ...
जयदीप भोगले
किमत
पैसे के दोस्त है सारे
पैसा सबका दुश्मन
नाम का है ये पैसा यारो
कच्चे इसके बंधन
' आसामी' बनती है इसके दम पे इन्सान नही
सोना खरीदता है ये दिल नही
पैसे के पेड से बाग खिलते नही सुने पडते है आंगन
पांचाली दावं पर लगायी इसने
रिश्तो मी दरार लायी इसने
पर आदमी इन्सान जोड न सका
पैसे को गले लागाय उसने
गुण परखे जाते है दिल से
पर स्वार्थ का बनाया इसने दर्पण
फिर भी बनते है आज भी ' भीमराव'
पैसे को रौन्धकर
श्रीकृष्ण सुदामा कि यारी ऐसी
जो अमर हो गयी पैसे कि दिवार चीरकर
एक सच्चा दोस्त होता है
पैसे से कही बढकर
अपना दोस्ती को ए मनुज
तोड के सारे बंधन
किमत परख दोस्ती की
यही है कस्तुरी यही है चंदन
जयदीप भोगले
२७ - जून -१९९९
Friday, August 13, 2010
अफलातून..?? तद्दन फालतू ....
कार्यक्रम - अफलातून लिटल मास्टर्स ( म्हणजे अगोचर मूले )
वाहिनी - ई टीवी
वेळ - बुधवार गुरुवार ९.३० रात्रौ
मित्रहो कदाचित हा लेख वाचून तुम्हाला माझे ई टीवी वहिनीबरोबर वैर किवा त्या वाहिनीबद्दल तुम्हा सर्वांचे मत कलुषित व्हावे अशी इच्छा आहे असे वाटणार किवा वाटू शकते. (कारण मी बाजीराव मस्तानी बद्दल ही फार शिफारसीचे लिहिले नव्हते.).
पण राजू परुळेकरांचा संवाद , "आठवणीतले बाबूजी.. हा शो , एके काळी ताजी असणारी मालिका -या गोजिरवाण्या घरात या मला मनापासून आवडतात ..अगदी आजही... म्हणूनच दोन्ही तर्क आपण मनातून काढून टाकावेत.
मी मराठी वाहिनी पाहणारा व त्याबद्दल प्रेम वाटणारा एक दर्शक आहे. कुठलाही अ-दर्शनीय कार्यक्रम पाहून मनाला वाटणारा विषाद मी आपल्यासमोर मांडतो. किवा चांगला वाटणारा कार्यक्रम,सिनेमा आपण पाहावा त्याचा आनंद लुटावा अशी माझी इच्छा असते.
तसा अफलातून हा कार्यक्रम सुरु होऊन बरेच दिवस झाले पण सुरवातीला अगदी वाईट मत ते ही लहान मुलांच्या कार्यक्रमाबद्दल छे छे .. म्हणून मी गप्प होतो . पण आता कालच हा कार्यक्रम पहिला आणि मला राहवले नाही आणि की-बोर्ड हातात घेतला ( पूर्वी लेखणी घ्यायचो .. जरा वाक्प्रचारात बदल)
आता जरा कार्यक्रमाबद्दल बोलतो की बोलावे हे जरा कठीणच आहे पण आता मीच सांगणार म्हणजे सांगणे भाग आहे.
काही अगोचर पोरे विनोदबुद्धी नसताना उगाच स्टेजवर येऊन धुडगूस घालतात . ब-याच वेळा त्यांना काय म्हणायचे आहे हे तुम्हाला जर कळले तर मला कळवा. त्यात सूत्रसंचालन असंभव मधील सुलेखा -नीलम शिर्के आणि एका पेक्षा एक छोटे चम्पिएन्स मधील छोटी मुलगी जमेल तितके अवसान आणून स्पर्धकांना चांगले म्हणतात. आता या दोघी कॉमेडी कार्यक्रमात सूत्र संचालन कशा आणि का करतात ? झी वाहिनीवर लोकप्रिय झाल्या म्हणून कदाचित ..
इंडिअन लाफ्टर च्यालेंज चा विजेते सुनील पाल आणि प्रेक्षकाच्या हृदयात आपल्या हास्याचे हळुवार फवारे मारणारे आपले लाडके प्रशांत दामले या कार्यक्रमचे मान्यवर परीक्षक ( दुर्दैवी) आहेत . या बिचा-यांना या मुलांना काय सांगावे तेच कळत नाही . सुनील पाल (हिंदी वाहिनीवरची सवय )असल्यामुळे बेमालूमपणे हसण्याचा उत्तम प्रयोग सादर करतात. प्रशांत दामले आपण लहानपणी कसे होतो ( उत्तम) आणि इथे कुठून आलो अशा हावभावात कार्यक्रम पुढे रेटतात.
तूमची विनोदबुद्धी अगदी सढळ मराठवाडी असेल तरी आपण त्या कार्याक्रमातील विसंगती आणि उगाच टाळ्या ( आधी वाजवून घेतलेल्या ) वाजवणाऱ्या प्रेक्षकांना बघून तुम्ही हसू शकता . लहान मुलांना प्रोत्साहन द्यावे हे कबूल आहे पण ते सा रे ग म प , एका पेक्षा एक , कलर्स मधील छोटे उस्ताद यांनी ही दिले पण त्या बरोबर प्रेक्षकांना मनोरंजन अव्वल दर्जाचे मिळावे याबद्दल ही दक्षता घेतली.
कुठलाही कार्यक्रम असो त्यातला गुणवत्तेचा दर्जा अगदी.. ग्रामीण भागात आवडणारा असला तरीही, चांगलाच हवा. माझ्या मते अगदी छोट्या मुलांना सुद्धा फाजील प्रोत्साहन देण्यात की अर्थ आहे.? कदाचित वाहिनीवर येण्याचा अट्टाहास आणि त्या चंदेरी जगाचे आकर्षण असल्यामुळे काही मुले अभ्यास चांगला करत असतील ,किवा चित्र काढत असतील तरी या सवंग प्रसिद्धीच्या मागे लागतात आणि त्यांचे पालक ही त्यांचे कौतुक करतात. म्हणूनच कि काय असले दर्जाहीन कार्यक्रम आपल्याला काही वाहिन्यांवर दिसतात .
आणि मी असे ऐकले आहे या कार्यक्रमाची टी आर पी चांगली आहे ( हा एक विरोधाभास म्हणावा लागेल .)
आता माझे मत आपल्याला आत्यंतिक वाटत असेल तर आपणच पाहून खात्री करावी आणि कळावे .
जयदीप भोगले म
वाहिनी - ई टीवी
वेळ - बुधवार गुरुवार ९.३० रात्रौ
मित्रहो कदाचित हा लेख वाचून तुम्हाला माझे ई टीवी वहिनीबरोबर वैर किवा त्या वाहिनीबद्दल तुम्हा सर्वांचे मत कलुषित व्हावे अशी इच्छा आहे असे वाटणार किवा वाटू शकते. (कारण मी बाजीराव मस्तानी बद्दल ही फार शिफारसीचे लिहिले नव्हते.).
पण राजू परुळेकरांचा संवाद , "आठवणीतले बाबूजी.. हा शो , एके काळी ताजी असणारी मालिका -या गोजिरवाण्या घरात या मला मनापासून आवडतात ..अगदी आजही... म्हणूनच दोन्ही तर्क आपण मनातून काढून टाकावेत.
मी मराठी वाहिनी पाहणारा व त्याबद्दल प्रेम वाटणारा एक दर्शक आहे. कुठलाही अ-दर्शनीय कार्यक्रम पाहून मनाला वाटणारा विषाद मी आपल्यासमोर मांडतो. किवा चांगला वाटणारा कार्यक्रम,सिनेमा आपण पाहावा त्याचा आनंद लुटावा अशी माझी इच्छा असते.
तसा अफलातून हा कार्यक्रम सुरु होऊन बरेच दिवस झाले पण सुरवातीला अगदी वाईट मत ते ही लहान मुलांच्या कार्यक्रमाबद्दल छे छे .. म्हणून मी गप्प होतो . पण आता कालच हा कार्यक्रम पहिला आणि मला राहवले नाही आणि की-बोर्ड हातात घेतला ( पूर्वी लेखणी घ्यायचो .. जरा वाक्प्रचारात बदल)
आता जरा कार्यक्रमाबद्दल बोलतो की बोलावे हे जरा कठीणच आहे पण आता मीच सांगणार म्हणजे सांगणे भाग आहे.
काही अगोचर पोरे विनोदबुद्धी नसताना उगाच स्टेजवर येऊन धुडगूस घालतात . ब-याच वेळा त्यांना काय म्हणायचे आहे हे तुम्हाला जर कळले तर मला कळवा. त्यात सूत्रसंचालन असंभव मधील सुलेखा -नीलम शिर्के आणि एका पेक्षा एक छोटे चम्पिएन्स मधील छोटी मुलगी जमेल तितके अवसान आणून स्पर्धकांना चांगले म्हणतात. आता या दोघी कॉमेडी कार्यक्रमात सूत्र संचालन कशा आणि का करतात ? झी वाहिनीवर लोकप्रिय झाल्या म्हणून कदाचित ..
इंडिअन लाफ्टर च्यालेंज चा विजेते सुनील पाल आणि प्रेक्षकाच्या हृदयात आपल्या हास्याचे हळुवार फवारे मारणारे आपले लाडके प्रशांत दामले या कार्यक्रमचे मान्यवर परीक्षक ( दुर्दैवी) आहेत . या बिचा-यांना या मुलांना काय सांगावे तेच कळत नाही . सुनील पाल (हिंदी वाहिनीवरची सवय )असल्यामुळे बेमालूमपणे हसण्याचा उत्तम प्रयोग सादर करतात. प्रशांत दामले आपण लहानपणी कसे होतो ( उत्तम) आणि इथे कुठून आलो अशा हावभावात कार्यक्रम पुढे रेटतात.
तूमची विनोदबुद्धी अगदी सढळ मराठवाडी असेल तरी आपण त्या कार्याक्रमातील विसंगती आणि उगाच टाळ्या ( आधी वाजवून घेतलेल्या ) वाजवणाऱ्या प्रेक्षकांना बघून तुम्ही हसू शकता . लहान मुलांना प्रोत्साहन द्यावे हे कबूल आहे पण ते सा रे ग म प , एका पेक्षा एक , कलर्स मधील छोटे उस्ताद यांनी ही दिले पण त्या बरोबर प्रेक्षकांना मनोरंजन अव्वल दर्जाचे मिळावे याबद्दल ही दक्षता घेतली.
कुठलाही कार्यक्रम असो त्यातला गुणवत्तेचा दर्जा अगदी.. ग्रामीण भागात आवडणारा असला तरीही, चांगलाच हवा. माझ्या मते अगदी छोट्या मुलांना सुद्धा फाजील प्रोत्साहन देण्यात की अर्थ आहे.? कदाचित वाहिनीवर येण्याचा अट्टाहास आणि त्या चंदेरी जगाचे आकर्षण असल्यामुळे काही मुले अभ्यास चांगला करत असतील ,किवा चित्र काढत असतील तरी या सवंग प्रसिद्धीच्या मागे लागतात आणि त्यांचे पालक ही त्यांचे कौतुक करतात. म्हणूनच कि काय असले दर्जाहीन कार्यक्रम आपल्याला काही वाहिन्यांवर दिसतात .
आणि मी असे ऐकले आहे या कार्यक्रमाची टी आर पी चांगली आहे ( हा एक विरोधाभास म्हणावा लागेल .)
आता माझे मत आपल्याला आत्यंतिक वाटत असेल तर आपणच पाहून खात्री करावी आणि कळावे .
जयदीप भोगले म
प्रणय
भाळलेल्या या क्षणांना
नयन कटाक्षाची धुंदी आहे
दीप मालावण्यास विलंब नको
बेधुंद आज पुनव आहे
लाजित्त तुझी धवल कांती
तीवर चांदण्यांची दुलई शोभून राहे
मिठीत ढील नको प्रिये
चंद्र आज घायाळ आहे
मंद रातराणीच्या बहर तो
सुगंधाचा संग आहे
निवांत एकांत क्वचित भेटे
प्रेम आज आतुर आहे.
जयदीप भोगले
२-१०-१९९९
Thursday, August 12, 2010
उदासी
ये कैसी ही उदासी
उसकी याद जहन से न जाती
दिल ही बेबस लबो ओये ही खामोशी
जी राहा हुं जिंदगी जो खुदा ने ही बख्शी
ये कैसी ही उदासी
ख़ुशी होती है मगर रहती है सिसकीया जरासी
जख्म भरते है मगर बचती है खराशे जरासी
सोता हुं रात को मगर सपने से न वो जाती
एक कशिश है वो पर सीमटीसी शर्मायीसी
पड़ती है बारिश की बूंदे मगर ठंडी आग है जलाती
भुलाना चाहता हूँ मगर उठती है कसक जरासी
पीता हूँ जाम जब पैमाने जैसे जिन्दगी है बाकि सी
टूटे दिल को जोड़ता हूँ तो बन जाती है तसवीर खुबसूरत सी
जो है बेवफा ऐसे मेरे माशूक की
इश्क का मर्ज यारो ऐसा
जैसे तलवार हलक से उतर है जाती
बहता है खून बचती है बूंदे
वही दिल से कराह है उठाती
तभी दर्द शायरी बन है जाती
शायरी बन जाती
हिंदी शायरी उदासी कविता
जयदीप भोगले
१२-०१-९९
उसकी याद जहन से न जाती
दिल ही बेबस लबो ओये ही खामोशी
जी राहा हुं जिंदगी जो खुदा ने ही बख्शी
ये कैसी ही उदासी
ख़ुशी होती है मगर रहती है सिसकीया जरासी
जख्म भरते है मगर बचती है खराशे जरासी
सोता हुं रात को मगर सपने से न वो जाती
एक कशिश है वो पर सीमटीसी शर्मायीसी
पड़ती है बारिश की बूंदे मगर ठंडी आग है जलाती
भुलाना चाहता हूँ मगर उठती है कसक जरासी
पीता हूँ जाम जब पैमाने जैसे जिन्दगी है बाकि सी
टूटे दिल को जोड़ता हूँ तो बन जाती है तसवीर खुबसूरत सी
जो है बेवफा ऐसे मेरे माशूक की
इश्क का मर्ज यारो ऐसा
जैसे तलवार हलक से उतर है जाती
बहता है खून बचती है बूंदे
वही दिल से कराह है उठाती
तभी दर्द शायरी बन है जाती
शायरी बन जाती
हिंदी शायरी उदासी कविता
जयदीप भोगले
१२-०१-९९
उमेदीची शिदोरी
रडवून गेला पण तो हसवू कधी शकला नाही
शारदेच्या पायावरती फूल मी वाहिले होते
निर्माल्यात गेले अगतिक पण मला कधी उमजले नाही
उमेदीची शिदोरी घेऊन जगप्रवासास मी निघालो
सागरात मी वल्व्ह्त राहिलो पण पाणी कधी संपले नाही
जणू भुकेल्या मुलाच्या समाधानासाठी मनाने पाणी खुप शिजवले
जेवणाच्या आशेवर भूक माझी शमली नाही
जीवनाच्या गणिताची पाने मी उलटत आहे
वजाबाकित पक्का झालो पण बेरीज कधी जमली नाही
जयदीप भोगले
२० ऑक्टोबर १९९९
Wednesday, August 11, 2010
कटी पतंग
फूल कि चाहत थी हमें काटो की इनायत मिली
सोचा था ये चाहत हमें संवारेगी
भटकती नाव एक दोर से बांध लेगी
दिल की लगी को बना दिया दिल्लगी उसने
भोली सूरत से नफरत हि मिली
जाना था बहाव के सहारे दूर कही
साहिल हि मिलेगा यह दिल की थी अनकही
मौत भी आई तो भंवर समेट लेगा हमें
यही थी दिल की दुहाई.
पर भंवर की आगोश भी न हुई नसीब किनारे पे एक आशिक की मौत मिली
तकदीर से नही है गिला
ये तो लकीरे हि लिखति है सिलसिला
लकीर ने बांधी थी कच्ची डोर प्यार की
जिंदगी कटी पतंग बन के रह गयी
जयदीप भोगले
२५ मे १९९९
Tuesday, August 10, 2010
पोवाडा
डफ वाजवुनी शाहिराचा
शब्द आगीचा एका मर्दाचा
पोवाडा रचला नव्या युगाचा
स्मरून शिवराय हो जी जी जी
राकट मावळ्याने
मोठ्या अभिमाने
घेउनी मदिरेचा प्याला
शब्द आगीचा एका मर्दाचा
पोवाडा रचला नव्या युगाचा
स्मरून शिवराय हो जी जी जी
राकट मावळ्याने
मोठ्या अभिमाने
स्वराज्य स्थापन केले जी जी जी
शिवरायांचा आठवूनी प्रताप
होते शीर नतमस्तक जी जी
पण नवीन युगाने घात केला
रांगडा गाडी तो मेला
ज्याला मिळे इनामी शेला
वाया गेला स्वार्थापायी तो र जी जी
शिवराय होते मुत्सद्दी
फिरंगी धूर्त बुद्धी
होती ठाऊक ती जी जी
आज पण ' डंकेल' फिरंगी आलाघेउनी मदिरेचा प्याला
मराठी गाडी रे त्यात वाहला हो जी जी
विसरून गेला काळी आई
सत्तेच्या पायी
पूजितो ती तुळजाईमते मागण्या ती जी जी
आहे एका शाहिराची विनवणी
पडू द्या हो कानी
ऐका जरा अवधान देऊनी जी जी
ज्ञानोबांची संस्कृती जपा
काढू नका झोपा
देशाभिमाने र जी जी
बना तुम्ही मराठी मावळे र जी जी
जयदीप भोगले
२१ एप्रिल १९९९
Monday, August 9, 2010
कोहरा
हद पार कर दी मैने
और मुझे पता भी न चला
एक कश कि ही यह कश्मकश
ये नशा ही बुरी बला
धुए कि साथ से सासें हुई थी गर्म
पार कोहरे मी पहुंचने का पता भी न चला
नशीली दवा के गर्दिश मे
दुआ का भी न साथ मिला
रंगीनीयात के खिचांव से
रंग बेरंग होने का शुरू हुं सिलसिला
गर्द के दम से दिखाई थी मर्दानगी मैने
जीवन जर्द बनने का पता भी न चला
खुशनुमा जिंदगी का सपना आंखो मे ही रह गया
आंखे बंद होने का मुझे पता भी न चला
अब रूह भी कांप उठती ही नशे के खयाल से मेरी
उसी रूह को शरीर का सहारा न मिला
जयदीप भोगले , हिंदी , कोहरा, कविता
२० जुलै १९९९
Friday, August 6, 2010
श्रावण
आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन
पाचूंच्या दागिन्याने
धरित्रीला सजवून
लेणे हिरव्या शालुचे घेऊन
वाहू लागले ओसंडून
जलामृताचे भवन
वेड्या चातकाला सुद्धा
मिळे अमृताचे भोजन
आला मेघराजा गर्जून गर्जून
बहरून बहरून
वरुणराजा , जल हे जीवन
पण वाग जरा जपून
नाहीतर ऐकू येतील स्पंदने
जीविताची करुण
अंध:कारच्या घरून
येईल अमृताचा प्याला
तेव्हा हलाहल घेऊन
जयदीप भोगले
२५ ऑक्टोबर १९९८
Thursday, August 5, 2010
जीवनसंध्या
'कालचक्र' या नाटकाच्या कथे वरून प्रेरित होऊन मी हि कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सामर्थ्यशाली आणि सूर्यासम माणसाचे सुद्धा उतारवयात जी मानसिक घालमेल होते ती यात सूर्य हे प्रमुख व्यक्तिचित्र घेऊन चितारण्याचा प्रयत्न केला आहे.
ही कविता मी माझ्या कॉलेज जीवनात कालचक्र नाटक वाचून केली होती. प्रभावी कथावस्तू कशी प्रेरणा देते त्याचे हे उदाहरण वाटते
आला न परी काळोख शेवटचा
आली नकळत हि जीवनसंध्या
मध्यानेची रखरख संपे तरीही
बोचते हे जीवन सध्या
दुडूदुडू धावत पाहत संपली
बागडलो मी सोनसकाळी
धावलो मी भास्कारासंगे
पण धाप टाकिती जीवनसंध्या
चंद्राचेही डोळे दिपविले
विन्ध्यासही मी ओलांडले
पण पायथ्यास येत मी रे
मज तारका दाखविती वेडावुनी
अलगद उघडूनी मेघाचा पडदा
फाडून काळीज आकाशाचे
रविकर माझे मी वाढवियले
पण विस्तार मी वाढविता
ते विखरून गेले माझे न उरले
जीवनदात्या रवीसही ,
ग्रहण लाविती जीवनसंध्या
झाली जरीही जीवनसंध्या
सांजवात ती नेमाने करते
तरीही ' येईल अरुण सारथ्यास अपुल्या'
रात्री मज रोज सांगते
मी ही जगतो ही संध्या
मनात जपून रोज उद्या
पण अस्ताची नित्य वाट पाहते
थकलेली ही जीवनसंध्या
जयदीप भोगले
२३ जुलै १९९९
ही कविता मी माझ्या कॉलेज जीवनात कालचक्र नाटक वाचून केली होती. प्रभावी कथावस्तू कशी प्रेरणा देते त्याचे हे उदाहरण वाटते
आला न परी काळोख शेवटचा
आली नकळत हि जीवनसंध्या
मध्यानेची रखरख संपे तरीही
बोचते हे जीवन सध्या
दुडूदुडू धावत पाहत संपली
बागडलो मी सोनसकाळी
धावलो मी भास्कारासंगे
पण धाप टाकिती जीवनसंध्या
चंद्राचेही डोळे दिपविले
विन्ध्यासही मी ओलांडले
पण पायथ्यास येत मी रे
मज तारका दाखविती वेडावुनी
अलगद उघडूनी मेघाचा पडदा
फाडून काळीज आकाशाचे
रविकर माझे मी वाढवियले
पण विस्तार मी वाढविता
ते विखरून गेले माझे न उरले
जीवनदात्या रवीसही ,
ग्रहण लाविती जीवनसंध्या
झाली जरीही जीवनसंध्या
सांजवात ती नेमाने करते
तरीही ' येईल अरुण सारथ्यास अपुल्या'
रात्री मज रोज सांगते
मी ही जगतो ही संध्या
मनात जपून रोज उद्या
पण अस्ताची नित्य वाट पाहते
थकलेली ही जीवनसंध्या
जयदीप भोगले
२३ जुलै १९९९
Wednesday, August 4, 2010
मकरंद अनासपुरे- (अ पुणेरी ) मराठी भाषेचा ट्रेंड सेटर
- मकरंद अनासपुरे- (अ पुणेरी ) मराठी भाषेचा ट्रेंड सेटर
मकरंद अनासपुरे नाव नुसते उच्चारले तरी हसू फुटते आजकाल ...!!!
.. ते या वल्लीच्या नावाने नाही... तर त्या नावाने डोळ्यासमोरून जाणाऱ्या त्याने केलेल्या चित्रपटाच्या भूमिकेने. त्यांच्या बीड नगर च्या खास भाषाशैलीने ...
मला चांगले आठवते की मी रविवारी इ टीवी वर " दि एंड चा शेवट " कार्यक्रम पाहायचो .. ताई सांगयची बीडी ( बीडच्या ) भाषेमध्ये एक तरुण त्यात संयोजन करतो आणि जाम मजा येते.
बीड माझे आजोळ त्यामुळे या माणसाची शैली मला भावून गेली आणि मी अगदी सुरवाती पासून या नटाचा ' पंखा ( fan ) झालो.
मग यशवंत, सावरखेड- एक गाव यातल्या छोट्या भूमिका हि कुठेतरी घर करून गेल्या. वास्तव मधली छोटीशी भूमिका आणि मकरंद अनासपुरेंची अंगकाठी बघून मजा आली
मी शिक्षणानिमित्त दिल्लीला गेलो आणि मग मला कळले कि मकरंद हि वावटळ आता वादळवाट बनू लागली आहे . माझा विश्वास बसेना .. यासाठी नाही कि या वल्लीकडे प्रतिभा नाही.. पण कौतुक ऎकायची उपेक्षित मराठवाड्याला सवय नाही ....
. शुद्धतेच्या पुणेरीपणा रांगडा सातारी आणि कोल्हापुरीपणा ... मुंबईचा आंग्ल मराठीपणा आणि इरसाल नागपुरी खाक्या आमच्या मराठवाडी साधेपणाला जागा देतील यावर विश्वास बसेना...
पण मी "कायद्याच बोला" पहिला आणि सर्व लख्ख झाले. हा मराठवाडी एकलव्य अभिमन्यू बनून चित्रपट क्षेत्राचे चक्र्व्युव्ह भेदून पार गेला होता. समोर मात्तबर कलाकार असूनही मकरंद अनासपुरेनी कायद्याच बोला ची केशव कुन्थाल्गीरीकारची भूमिका अविस्मरणीय केली. त्याची संवाद फेकेची लकब . अस्सल मराठवाडी आणि गावरान म्हणी यांनी नटलेली पण अभिनयाने तितकीच सशक्त भूमिका त्याने करण्या सुरवात केली.
हा चित्रपट सुपरहिट ठरला ... मग तद्नंतर आलेले " बघ हात दाखवून ", "नाथ पुरे आता", " गाढवाचे लग्न "असे कित्येक चित्रपट तिकीट बारीला यशस्वी ठरले .. दादू इंदुरीकरांचे अजरामर नाटक चित्रपट म्हणून सादर करणे खायचे काम नव्हते पण याने ते पेलून धरले. आणि म्हणूनच छोट्या छोट्या भूमिकेत हि अनासपुरे असावा चित्रपट निर्मात्यांना वाटू लागले.
२००५ नंतर अनासपुरे भाऊंनी मागे वळून पहिले नाही. साडे माडे तीन ,दे धक्का , जाऊ तिथे खाऊ असे कितीतरी सुपर डुपर चित्रपट त्यांनी दिले.
दे धक्का , गोष्ट छोटी .. यात गंभीर भूमिका करण्याचा चांगला प्रयत्न केला..
मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमातही मकरंद अनासपुरेचे एखादे तरी स्कीट एका झुण्क्यासारखे टीआरपी साठी वापरणे सुरु झाले . हास्यसम्राट सारख्या शो मध्ये सुद्धा या हास्य सम्राटाचे नाव परीक्षक म्हणून पुढे आले.
मकरंद अनासपुरेनी "लक्ष्या "गेल्यानंतर त्यांची उणीव लोकांना हlस्यादराबारात जाणवू दिली नाही यातच त्यांना खरी पावती आहे .
आणि मकरंद अनासपुरेनी कॉमेडी मध्ये अपुणेरी इरसाल pattern सुरु केला आणि म्हणूनच कि काय लोकांना भाषा पद्धतीने निर्माण होणारे विनोद भावू लागले.
म्हणूनच हास्यसम्राट चा विजेता सोलापूरचा .. कित्येक चित्रपट नागपुरी खानदेशी भाषेला प्राधान्य देऊन बनू लागले. आणि भाषे मधला हेल, शब्द , अशुद्ध्पण नसून हा भाषेचा एक प्रकार आहे हे लोकांना कळू लागले . ते आवडू लागले .
पुणेरी भाषा हो गोड भाषा नक्कीच आहे यात वाद नाही पण त्यामुळे इतर भाषांना ही आपला बाज आहे हे कुठेतरी अनासपुरे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर लोकांना पचू लागले.
आणि कदाचित यामुळेच मी मकरंद अनासपुरे याला एक ट्रेंड सेटर मानतो आणि कदाचित
यामुळेच तो एक सम्राट आहे कॉमेडी सम्राट......
जयदीप भोगले
यामुळेच तो एक सम्राट आहे कॉमेडी सम्राट......
जयदीप भोगले
Subscribe to:
Posts (Atom)
31 डिसेम्बर
31 डिसेंबर मला भारी अजब वाटते कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...
-
31 डिसेंबर मला भारी अजब वाटते कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...
-
वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक...
-
मित्रांनो , कधी कधी वैफल्य फ्रस्ट्रेशन चांगली रचना घडवून आणते याचा मला प्रत्यय आला . ही कविता मी दोन भागात जवळ जवळ ६ महिन्याच्या गॅप मध्ये...