Monday, September 6, 2010

मास्तर



एक दीपस्तंभ जनसागरात जळतो
तो अखंड आयुष्य वाट दाखवतो
कुणी त्याची वाटाड्या म्हणून हेटाळणी करतो
तरी कुणी सहानुभूती म्हणून 'मास्तर' म्हणतो
रक्ताचे पाणी करून तो लोकांना शिकवतो 
    पण तरीही लोक म्हणती मास्तर भारी फसवतो
    कुणी त्याची ५०० रुपये म्हणून किंमत करतो
  तरीही दरवर्षी काही मास्तरांना ' आदर्श शिक्षक ' हा
   कागदी  फुलांचा गुच्छ  जरूर मिळतो 
        
     पण मास्तराच्या मनाचे कोण विचारतो
    त्याच्या निष्काम उपासनेबद्दल दखल कोण घेतो
                                      डॉक्टर इंजिनिअर ला बनवणारा मूर्तिकार हा नेहमी मुर्तीमागेच लपतो
                                                     पण त्याच्या मूर्तीची मात्र आपण फार वाहवा करतो
मास्तर हा नेहमी अल्पसंतोषी राहतो
मूर्तीची वाहवाच आपले गुणगान मानतो
चिंतनाचा पुजारी हा पण शाळेतच बंद राहतो
शाळेच्या घंटेबरोबर आपले घड्याळ लावून घेतो
एका नवीन पिढीच्या शिल्पासाठी खडू हे हत्यार हातात घेतो 
जयदीप भोगले
१९-१०-९९  

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...