Wednesday, September 8, 2010

युद्ध










गवाक्ष्याच्या पलीकडून नयनतीरानी मला घायाळ करशील का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
      
प्रेमवीरानी नेहमी निडर असावे मग लोकांच्या नजरा चुकवीत तू वार का करावे 
  मी निधड्या छातीने तुझ्यासमोर  आहे एकाच रामबाण कधी सोडशील का
    ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का

शीतयुद्धात कधी प्रश्न सुटत नसतात
त्यात बरेचसे तीर आपल्यालाच बोचत असतात
मनाच्या अश्वावर आरूढ़ होऊं
कधी सामोरे मला जाशील का
     
 अशी मनात  धुमसत राहू नकोस
      आग लावलीच  आहेस तर एकटीच जळत राहू नकोस
           एकदाच अशी पुढ्यात येउन द्वंद्व कधी करशील  का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
                                        
 युद्धात आणि प्रेमात बरेच कही साम्य असते
                              म्हणुनच दोघाना सर्व काही क्षम्य  असते
                               मी समर्पनास  तयार आहे ,
                                तुझ्या प्रेमात कधी अमर मला करशील  का
                               ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का


 जयदीप भोगले 
१२.१०.२००२

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...