मी या प्रतिक्रिया चित्रपट समीक्षक म्हणून न देता मला काय वाटत्ते ते सांगतो .. म्हणुनच कदाचित काही कलाकारांचा उल्लेख यात राहून जातो पण जे कलाकार लक्षात राहतात त्यांच्याबद्दलच लिहावे नाही का ... नाहीतर उगाच एक ना धड असे होईल ..
आवडल्यास इतराना वाचायला सांगा ..नाहीतर आपण टिका करण्यास समर्थ आहातच ...
सरकारनामा -१९९८
दिग्दर्शक- श्राबनी देवधर
कलाकार- यशवंत दत्त , दिलीप प्रभावळकर , अश्विनी भावे
राजकारण आणि त्यातील नाट्यमय घडामोडी ते ही मुख्यमंत्र्याच्या मुलाचे लग्न या विषयातून अतिशय तडाखेबाज संवाद असलेला हा चित्रपट
हा चित्रपट फक्त श्री यशवंत दत्त आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पाहावा.
राजकारणी लोक किती धुरंदर असू शकतात ते हे दोघे दिग्गज हुबेहूब सादर करतात.
चित्रपटाच्या संकलन आणि सादरीकरणासाठी सलाम ...
लपंडाव १९९३
दिग्दर्शक- श्राबनी देवधर
कलाकार- अशोक सराफ , विक्रम गोखले , वंदना गुप्ते , सविता प्रभुणे ,आणि इतर सर्व जन प्रभावी
संवाद - मंगेश कुलकर्णी
संवाद - मंगेश कुलकर्णी
तीन फुल्या आणि तीन बदाम यावर आधारित भन्नाट कॉमेडी .. निखळ मनोरंजन
अशोक सराफ यांचे संवाद आणि संवाद फेक ज्यांना आवडते त्यानं हा चित्रपट संग्रही ठेवावाच .
विरोधी व्यक्तिमत्व, पुणेरी नावे, त्यांचे लाईफ स्टाइल दाखवण्याची पद्धत इतक्या बारकाईने मी दुसऱ्या कुठल्या चित्रपटात लिहिलेली बघितली नाही
पटकथा आणि हलके फुलके पण लक्षात राहणारे संवाद यासाठी रविवार दुपार नेहमीच यासाठी राखून ठेवावी असा चित्रपट
कळत नकळत - १९९१
दिग्दर्शक - कांचन नायक
निर्माती - स्मिता तळवलकर
कलाकार- विक्रम गोखले , सविता प्रभुणे , अश्विनी भावे , अशोक सराफ आणि दोन बाल कलाकार
गंभीर विषय गंभीर रीतीने कशे हाताळले जातात हे दाखवून देणारा चित्रपट
विक्रम गोखले आणि सविता प्रभुणे यांनी केलेला अभिनय . अश्विनी भावे यांची छोटी पण प्रभावी व्यक्तिरेखा .. आणि बाल कलाकारांची लक्षवेधी भूमिका यासाठी हा चित्रपट पाहावा.
मला हा चित्रपट कधी कधी अभ्यास म्हणून पाहावा वाटतो .. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात या चित्रपटाच्या कथा आणि त्यातील व्यक्तींबद्दल मला वेगळा दृष्टीकोन मिळाला आणी मिळत राहतो ..
असे चित्रपट विरळेच ...
थरथराट- १९८९
दिग्दर्शक आणि निर्माता - महेश कोठारे
कलाकार - लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे , राहुल सोलापूरकर
मसाला चित्रपटातून कसे मनोरंजन करावे हे महेश कोठारे यांना नेहमीच जमले .. आणि त्याचा उत्कर्ष म्हणजे हा सिनेमा.

तिकीटबारीवर हा चित्रपट जोरात चालला होता ..
महेश कोठारे सिनेमाचा मनमोहन देसाई सारखा एक फोर्मुला होता .. तो यात एकदम यशस्वी ..
त्यांचे बाकी चित्रपट ही अगदी याच सांगाड्यावर आधारित होते
पण कॉमेडी किंग लक्ष्याचा सुपर स्टार जमान्याचा कल्ला चित्रपट....
जयदीप भोगले
२३-०९-२०१०
No comments:
Post a Comment