Thursday, September 30, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट- का पाहावेत ( भाग -३)

अशी  ही  बनवा बनवी १९८८ 
दिग्दर्शक - सचिन
कलाकार- अशोक सराफ, सचिन , लक्ष्मीकांत बेर्डे 
अशी ही बनवा बनवी म्हणजे सचिन च्या कारकिर्दीतील सर्वात उत्तम सिनेमा .. आणि कदाचित कॉमेडी काळामधील सर्वोत्तम म्हणावा असा .
उत्तम शाब्दिक विनोद . स्त्री रूप असून कुठेही पाचकळ न होऊ देता साकारलेली भूमिका . अगदी छोट्या छोट्या सुद्धा  पण लक्षात राहणा-या भूमिका .
आणि उत्तम गाणी .. त्यामुळे प्रफुल्लीत करणारी कॉमेडी म्हणून संग्रही असावा असा सिनेमा ...

धाकटी सून १९८६ 
दिग्दर्शक - राजदत्त 
कलाकार- सविता प्रभुणे , उदय टिकेकर, स्मिता तळवलकर ,शेखर नवरे 
हा सिनेमा फार उत्तम अगदी वेगळी कथा असे काही नाही पण जेव्हा मी कौटुंबिक सिनेमा म्हणून अवलोकन करतो तेव्हा माहेरची साडी .. लेक चालली या पेक्षा मला हा चित्रपट जास्त आवडतो .
तीच जुनी स्टोरी मोठी सून वाईट .. मोठा मुलगा बैकोच्या ताटाखालचे मांजर .. छोटा मुलगा परागंदा .. पण श्रवणीय गाणी . शरद तळवलकर , स्मिता तळवलकर आणि सविता प्रभुणे यांनी हा सिनेमा पेलून धरला आहे ..
मला यातले... सांग तू माझाच ना हे गाणे फार आवडते ... 
माझ्या पत्नीने हे गाणे शिकावे असे मला फार वाटायचं मग तिने मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला  ही सी डी दिली .. म्हणून हा चित्रपट संग्रही ...

उंबरठा १९८२ 
दिग्दर्शक - जब्बार पटेल
कलाकार- स्मिता पाटील , गिरीश कर्नाड , 
आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलात्मक सिनेमा म्हणून या चित्रपटची गणना करावी वाटते .
स्मिता पाटीलने केलेली भूमिका मला विशेष लक्षात राहते .
काळजाचा ठाव घेणारी गाणी .. स्त्री उंबरठ्याबाहेर पडल्यानंतर तिचे बदलणारे जीवन .. महिलाश्रम या संस्थेचे भयानक वास्तव .. असा हा चित्रपट विस्कटून टाकतो ..
jaydeep bhogale 

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...