गेले दोन दिवस मी लोकसत्ताचा मुंबई अंक पाहतो आहे . आणि मला आश्चर्य वाटले ते त्याचे मुखपृष्ठ पाहून ...
पहिल्या पानावर फक्त जाहिराती ... महाराष्ट्रातील बातम्यांना , ज्वलंत विषयांना आता उघड करण्याची गरज उरली नाही कि अचानक सगळे ज्वलंत प्रश्न थंड झाले त्यामुळे आपल्याला छापावे असे वाटत नाही.
मी एक मार्केटिंग चा कार्यकर्ता असल्यामुळे जाहिरातीबद्दल मला तितकीच आस्था आहे . कदाचित त्या मिळाल्याशिवाय माध्यमांना चालवणे त्यांना जास्तीत जास्त चांगले बनवणे हे कठीण आहे याची मला संपूर्ण कल्पना आहे. पण हे म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले ... अशी गत झाली .
लोकसत्ता या बद्दल मला विशेष आदर आहे . कदाचित या प्रकारामुळे माझा आदर कमी झाला नाही पण हे त्यानी केले याबद्दल खेद जरूर वाटतो

शिवाय मी असे ऐकले आहे की जाहिरातदार पहिल्या पानावर जाहिरात देण्यासाठी आगाऊ रक्कम मोजतात आता जर सर्वच जाहिराती असतील तर त्यांनी ज्यादा रक्कम देणे सयुक्तिक वाटत नाही.आता कदाचित गणपती जवळ असल्यामुळे कदाचित त्यांना हा निर्णय घ्यावा लागत असेल पण सण संपल्यानंतर जाहिरातदार, भटाला दिली ओसरी ... असे ही वागू शकतात आणि तसे न वागल्यास त्यांच्या नंतर छापल्या जाणार-या जाहिराती वाचक दुर्लक्षित करू शकतात कारण पहिल्या पानावर थांबण्याची त्यांना सवयच राहणार नाही .
लोकसत्तामधील संपादकीय गुणवत्ता, त्यातील बातम्या देण्याचा दृष्टीकोन , भाषा या बद्दल मला कुठलाही रोष नाही कारण मला तो आजही तितकाच आवडतो चतुरंग ही पुरवणी आणि संपादकीय पान हे तर न चुकावण्यासारखे असते. पण आपल्या श्रद्धास्थानाबद्दल काही न पटणारी घटना घडली तर वाईट वाटते आणि यातूनच अशा प्रतिक्रिया निर्माण होतात. बातमी वाहिन्यांवर चालणारी बंडाळी आपण जाणतोच त्यामुळे वृत्तपत्र माध्यमांनी कुठेतरी संहिता बाळगावी नाहीतर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी वाचकांची अवस्था होईल
आपल्याला असा अनुभव आला आहे का कधी? असल्यास जरूर कळवा ... कळावे
मला सुद्धा तेच वाटते. बरेच वेळा लोकसत्ता च्य पहिल्या पानावरच्या जहिराती मी टाळतो व पुढच्या पानपासून वाचायला सुरवात करतो.
ReplyDelete